वनमहोत्सव 2016 अंतर्गत महापालिका शहरात 10 हजार वृक्ष लागवड करणार

 
20151214_213947-BlendCollageकोल्हापूर :- महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत वनमहोत्सव 1 जुलै 2016 एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2 कोटी वृक्षलागवड करणेचे निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका वनमहोत्सवादिवशी शहरात 29 ठिकाणी दहा हजार वृक्षांचे वृक्षारोपण करणार आहे.
यामध्ये चंबुखडी 1500 वृक्षांचे वृक्षारोपण सकाळी 9.00 वा महापौर सौ.अश्विनी  रामाणे यांच्या हस्ते व महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, शाळा, सामाजिक संस्था, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तसेच लक्ष्मीपुरी,ससुर बाग, पोलिस लाईन, गोळीबार मैदान, पॅव्हिलियन ग्राऊंड, जिल्हा न्यायालय नवीन बावडा, सक्रिट हाऊस, मुक्त सैनिक वसाहत, महाडिक वसाहत, शाहू कॉलेज परिसर, राजाराम कॉलेज, राजारामपुरी ओपनस्पेस परिसर, सैनिक कॉलनी परिसर, राजेंद्रनगर परिसर, टेंबलाई परिसर, सुभाषनगर परिसर, टी.ए बटालियन, बोंद्रेनगर परिसर कोतवालनगर, शिवशक्तीनगर, म्हाडा कॉलनी, आयसोलोशन ग्राउंड,जोतिर्लिंग नगर, नेहरूनगर रेणूका मंदिर चिले कॉलनी परिसर,  इराणी खण परिसर, फुलेवाडी दत्त्त मंगल कार्यालय रंकाळा शालिनी परिसर, साळोखेनगर चव्हाण कॉलनी परिसर, संभाजीनगर रेसकोर्स मैदान,गजानन महाराज नगर परिसर, तुळजा भवानी कॉलनी  शासकिय तंत्रनिकेतन, सहयाद्री हौ.सो.राजेंद्रनगर स्मृतीवन,सेनापती बापट रोड, कळंबा तलाव या ठिकाणी वृक्षारोपण एकाच दिवशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!