
कोल्हापूर : 2015-16 या आर्थिक वर्षात जाहिरातीद्वारे उत्पन्नाचेउद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल नवी दिल्ली येथे 20जून रोजी आयोजित एका समारंभात कार्यक्रम अधिकारी प्रविण चिपळुणकर यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रसार भारतीचे सी ई ओ जवाहर सरकार, आकाशवाणी चे महासंचालक एफ. शहरयार, दूरदर्शनचया महासंचालक अपर्णा वैश्य आणि प्रसार भारतीचे मेम्बर पर्सोनल पांडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारम्भ सेंट्रल ऑफिसर्स इंस्टिट्यूट ऑडिटोरियम चाणक्यपुरी येथे हा कार्यक्रम पार पडला. अतिरिक्त महासंचालक अमिताभ शुक्ल, एम. एस. थॉमस हे यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुम्बई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, बीड, परभणी, यवतमाळ, नाशिक, सांगली या केंद्र प्रतिनीधीचाही गौरव करण्यात आला. आव्हानांवर मात करून उत्पन्न वाढीचे नवे उच्चान्क प्रस्थापित करा असा संदेश जवाहर सरकार यांनी दिला.
Leave a Reply