महाआरोग्य शिबीर”अंतर्गत “डॉक्टर आपल्या दारी”अभियानाद्वारे डेंग्यू उच्छाटन :आ.राजेश क्षीरसागर

 

IMG-20160630-WA0017कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात दिवसेंदिवस डेंग्यूचा होत चाललेला झपाट्याने होत असलेला फैलाव रोखण्यासाठी आम. राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबीर अंतर्गत “डॉक्टर आपल्या दारी” अभियानाद्वारे डेंग्यू उच्छाटनाचा निर्धार आज करणेत आला. या अभियाना अंतर्गत बावडा परिसरात विविध ठिकाणी नागरिकांची रक्त आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. डेंग्यू बाबत नागरिकांनी पूर्व खबरदारी घ्यावी, डेंग्यूचे लक्षण आढल्यास तत्काळ डॉक्टरांच्या कडून उपचार घ्यावेत, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.

या मोहिमीची सुरवात निर्धार रलीने करण्यात आली. सकाळी ९ वाजता भगवा चौक ते पिंजर गल्ली अशी मुख्य रस्त्यावरून नागरिकांना तपासणी करिता आवाहन करणारी रली काढण्यात आली. या रली चा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक सौ.सुप्रिया देशपांडे, महापालिकेचे डॉ. विजय पाटील, डॉ.ए.डी. वाडेकर, डॉ.अजित लोकरे, डॉ.एस.पी.मिर्गांडे, डॉ. एम.व्ही. बामोडे, डॉ. बी. एस. थोरात, अजित गायकवाड, डॉ. एस. एफ. देशमुख, सुनील करंबे, डॉ. सुहास पेडणेकर, राजेश पाटील, ता. ब. पाडळकर, प्र. ख. जखलेकर, संजय क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, श्री बलभीम विद्यालय, छ. राजाराम हायस्कूल, प्रिन्स शिवाजी शाळेचे विध्यार्थी व शिक्षक, महानगरपालिकेचे कर्मचारी, शहरातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

यानंतर कसबा बावड्यातील सुमारे २६ जागांवर सुमारे ४० रुग्णवाहिका उपलब्ध करून नागरिकांच्या रक्ताचे नमुने आणि आरोग्य चाचणी करण्यात आली. यामध्ये डेंग्यू सदृश्य व्यक्तीस पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याच बरोबर डेंग्यू पासून बचावाच्या उपाययोजनाही नागरिकांना सांगण्यात आल्या. कसबा बावड्यातील शिवसेना विभागीय कार्यालय, उलपे मळा, गंगा मिल्क, बेकारी ग्रुप, प्रिन्स शिवाजी शाळा, श्री बलभीम विद्यालय, छ. राजाराम हायस्कूल, आंबेडकर चौक, हनुमान मंदिर, जय भवानी गल्ली, दत्त मंदिर, झेंडा चौक, कै. सुरेश संकपाळ चौक, शिंदे गल्ली, पिंजर गल्ली, चव्हाण गल्ली, चिंतामणी कॉलनी, शाहू कॉलनी, पाटील गल्ली, बिरंजे पाणंद, लाईन बझार, मराठा कॉलनी आदी ठिकाणी रुग्णवाहिका उभी करून नागरिकांची कुशल डॉक्टर्स, रक्त तपासणी यंत्रणा, नर्स, आदीसह तपासणी करण्यात आली. या अभियानामध्ये सुमारे ४००० नागरिकांची तपासणी करण्यात आली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सीपीआर प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महानगरपालिका आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, याच्यासह शहरातील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल, अपल हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, गणेश हॉस्पिटल, सनराईज हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, मगदूम हॉस्पिटल, मसाई हॉस्पिटल, साई कार्डीयाक, अस्टर आधार, आनंद हॉस्पिटल, शहरातील विविध ब्लड बँक आदी सर्व यंत्रणा सह्भागी झाली होती.

या अभियानामध्ये शिवसेनेचे सुनील जाधव, दिनकर उलपे, संजय लाड, दीपक गौड, सचिन पाटील, भीमराव बिरंजे, राजू काझी, राहुल माळी, सचिन रोकडे, अक्षय खोत, राकेश चव्हाण, रवींद्र माने, विनायक जाधव, जयवंत हरुगले, रमेश खडे, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, किशोर घाटगे, सुरेश कदम, रणजीत जाधव, रुपेश इंगवले, शैलेश साळोखे, चेतन शिंदे, पियुष चव्हाण, निलेश हंकारे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!