जिल्हयातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

 

कोल्हापूर :  महाराष्ट्रात आणखी पन्नास कोटी वृक्ष असणे आवश्यक आहे. त्यासाठी यावर्षी पासूनच शासनाने 2 कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ आज राज्यात सर्वत्र एकाच वेळी होत आहे. वृक्ष लागवडीबद्दल लोकांमध्ये झालेली जाणीव जागृती पाहिली तर आज राज्यात 2 कोटी ऐवजी 4 कोटी वृक्ष लागवड होईल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निसर्ग संवर्धन होण्यासाठी अधिक झाडे लावा आणि ती जगवा, असे आवाहन केले.वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात करण्यात आला. यावेळी खासदार धनंजयराव महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्रीय संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वन संरक्षक एम.के.राव, उप वन संरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक टी.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.वृक्ष लागवड जितकी महत्वाची आहे, इतकेच महत्वाचे हे वृक्ष जगवणे आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा व देखभालीसाठी निधी उपलब्ध करावा. निसर्ग संवर्धन ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोल्हापूर सौंदरीकरण मोहिम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत 1 लाख झाडे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी दिनानिमित्त बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृदा आरोग्य पत्रिका अभियान राबवित असतांना केवळ आकडेवारीवर भर न देता ती मोहिम म्हणून राबवावी व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तापमानातील वाढ व वातावरणातील बदल, दुष्काळ यामुळे मानसाला वृक्षांचे महत्व पटले असून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होणे व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. धनंजय महाडिक युवक शक्तीच्या वतीने 20 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.IMG_20160701_135619कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरात सध्या 13 हजार झाडे असून आणखी 15 हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यापैकी आज 5 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले एन्व्हायरमेंट ऑडिट करणारे विद्यापीठ असल्याचे सांगून प्रत्येक कुटुंबाने किमान तीन वृक्ष लावावेत व ते जगवावेत असे आवाहन केल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!