आम्ही कोल्हापुरी झाडे घरो-घरी उपक्रमाअंतर्गत नगरसेवकांना वृक्ष वाटप

 
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आम्ही कोल्हापुरी झाडे घरो-घरी हा उपक्रमाअंतर्गत आज महावीर उद्यान येथे महापौर सौ.अिʉानी रामाणे यांच्या हस्ते नगरसेवक, नगरसेविकांना प्रत्येकी 50 वृक्षांचे वाटप करण्यात      आले.  नगरसेवकांना वाटप करण्यात आलेली वृक्ष 3 ते 4 वर्षांची पुर्ण वाढ झालेली असलेने त्यांचे सहज संगोपन होणार आहे. यामध्ये जारुळ, कडूलिंब, सोनचाफा, सिसम, स्पॅथोडिया, कांचन, बर्डचेरी इत्यादी विविध प्रकारची वृक्ष देण्यात आली. सदरची वृक्ष नगरसेवक आपल्या प्रभागात लावणार आहेत.
  IMG_20160705_172507  यावेळी महापौर सौ.अिʉानी रामाणे यांनी बोलताना नगरसेवकांनी दिलेली वृक्ष आपल्या प्रभागात लावून त्याचे संगोपन करावे त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल राखणेस मदत होणार आहे असे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनीही पर्यावरणाचे महत्व सांगितले.
    यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.वृषाली कदम, परिवहन समिती सभापती लाला भोसले, सभागृहनेता प्रविण केसरकर, प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजीत कदम, विजय सुर्यवंशी, स्थानिक नगरसेवक राहूल चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, कार्यकारी अभियंता प्रविण जाधव, पर्यावरण अभियंता आर.के.पाटील, बागा अधिक्षक निखील पचिंद्रे, सहा. बागा अधिक्षक प्रतिभा राजेघाटगे, गणेश खाडे, उद्यान विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!