सुभाष भामरे यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ

 

The President, Shri Pranab Mukherjee administering the oath as Minister of State to Shri Ramdas Athawale, at a Swearing-in Ceremony, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on July 05, 2016.

 नवी दिल्ली  : रिपब्लीकन पक्षा (आठवले गट) चे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य रामदास आठवले आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  तसेच पर्यावरण व वने राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.

राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक दरबारहॉलमधे आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या 19 मंत्र्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली तर पर्यावरण व वने राज्यमंत्री  प्रकाश जावडेकर यांना केंद्रीय मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आजच्या या शानदार समारंभात सर्वप्रथम श्री. प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून रिपब्लीकन पक्षाचे राज्यसभेचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते रामदास आठवले आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

महाराष्ट्राशिवाय मध्यप्रदेशातील मंडला येथील खासदार फग्गनसिंह कुलस्ते,पश्चिम बंगालमधून दार्जिलींगचे खासदार  एस एस अहलुवालिया,आसाममधील नगावचे खासदार राजेन गोहेनमध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार अनिल दवे,गुजरातमधून राज्यसभेचे खासदार पुरूषोत्तम रूपाला,राजस्थानमधील बिकानेरचे खासदार अर्जुनराम मेघवाल,उत्तर प्रदेशातील चंदौलीचे खासदार डॉ. महेंद्रनाथ पांडेउत्तरप्रदेशातील मिर्जापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल,उत्तरप्रदेशातील शाहजांपूरच्या खासदार कृष्णा राजराजस्थान मधील नागौरचे खासदार सी. आर. चौधरीराजस्थान मधील पालीचे सी.पी.चौधरी,गुजरातच्या दाहोद मधील जसवंतसिंह भाभोर,  उत्तराखंड मधील अल्मोडाचे अजय टम्टा,गुजरात मधून राज्यसभा खासदार मनसुख मंडाविया,तसेच  राज्यसभा सदस्य तथा ज्ये्ष्ठ पत्रकार एम जे अकबर,रमेश जिगजिनागी आणि विजय गोयल यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!