
मुंबई, : राज्यातील तूरडाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तूरडाळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना120 रुपये किलो दराने डाळ विकत मिळणार असून राज्यातील सुमारे 70 लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून राज्याला मिळालेली 700 मेट्रिक टन तूरडाळ खुल्या बाजारात याच दराने विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज येथे दिली.
Leave a Reply