मुंबई : महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गासाठी विधानभवनात आणि विधानभवानाबाहेर मंत्री पद नसतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलने करून आवाज उठवणारे नेते अशी ज्यांची ख्याती आहे असे भाजप चे मित्र पक्ष स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ओळखले जातात. म्हणून त्यांची राज्याच्या राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.
राज्यमंत्रिपदाची शपथ घेताना सदाभाऊ खोत शेतकऱ्यांना विसरले नाहीत. दोघांनीही शेतकऱ्यांना स्मरुन आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली.काळ्या मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मरुन शपथ घेतो”, असे म्हणत गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सुरुवात केली.कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला.दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार झाला. यामध्ये एकूण 11 जणांनी मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील 6 नवे कॅबिनेट, तर 5 राज्यमंत्री असणार आहेत. कुणाला कोणतं खातं मिळणार आहे, हे अद्याप जाहीर करण्यात आलेल नाही आहे.

Leave a Reply