
कोल्हापूर: जे.एस.टी.ए.आर.सी ही कोल्हापुरातील स्वसरंक्षणासाठी तायक्वांदोचे प्रशिक्षण देणारी नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून ही संस्था कोरीया येथील ‘कोरियाफेस्ट’ या कार्यक्रमात सहभागी होते व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते.या वर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी कु.अंकूष नागदेव व कु.जयकुमार करदानी आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होत आहेत.कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर संघाच्या बरोबरीने कोरिया येथील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.ही स्पर्धा कोरियातील तायक्वांदो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायक्वांदो वॉन मुजु पार्क या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च प्रशिक्षण यात फाइट,पुमसे, स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचे प्रशिक्षण ही घेता येणार आहे.या स्पर्धा दि.१४ जुलै ते २३ जुलै या दरम्यान कोरिया येथे होणार आहेत.त्याचबरोबर हा संघ कोरियातील तायक्वांदोच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट देणार आहे.कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील तायक्वांदो प्रशिक्षण माहिती आत्मसात करण्याबरोबरच ताय क्वांदो हेड क्वार्टर (कुक्कीवॉन) या राष्ट्रीय तायक्वांदो प्रात्यक्षिक संघाकडून प्रात्याक्षिके पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळणार आहे.या संघास जे.एस.टी.ए.आर.सीचे प्रमुख आणि तायक्वांदो तज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.
Leave a Reply