बनावट आणि खोटे जातीचे दाखले सादर करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा:आम आदमीची मागणी

 

IMG_20160709_130946कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालीकेच्या नगरसेविका सौ.वृषाली कदम,श्रीमती दीपा मगदूदुम आणि महापौर सौ.अश्विनी रामाणे आणि नगरसेवक निलेश देसाई,संदीप नेजदार,सचिन पाटील,संतोष गायकवाड या चार जणाचे नगरसेवक पद निवडणुकीत सादर केलेल्या जातीचे अवैध ठरल्याने रद्द केले गेले.पण महापौर यांच्यासह या सातही जणांनी बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर करून बेकायदेशीरपणे जातीचे दाखले अप्लावधीत प्राप्त करून शासनाला सादर केले.हि शासनाची आणि जनतेची घोर फसवणूक आहे.असे दाखले सादर करणारे नगरसेवक आणि देणारे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आल आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. याबाबत आम आदमीच्यावतीने या आधीही आयुक्तांना निवेदन देण्यात आले पण अद्याप कारवाई झालेली नाही.आम आदमी पार्टीच्या अभ्यास गटाने यात जयवंत पोवार,नाथाजीराव पवार आणि अप्पासाहेब कोकितकर यांनी माहितीचा अधिकार अन्वये याबाबतची माहिती संकलन केली.यात कोणत्याही कागदपत्रांचा पुरावा न देता फक्त जबाब घेऊन यांना ५ ते ६ दिवसात जातीचे दाखले दिले गेले.सर्वसामान्य लोकांना सरकारी दफ्तराच्या फेऱ्या मारून एका कागदासाठी त्यांचे काम अडविले जाते.आणि अशा नगरसेवकांना मात्र लगेच दाखले मिळतात.असे दाखले देणारे अधिकारीदेखील तेवढेच यांना सामील आहेत असे म्हणावे लागेल.त्याचप्रमाणे नगरसेवक पद आणि त्यानंतर महापौर पदाची शपथ घेताना मी खोटा जबाब दिला तर मी शिक्षेस पात्र राहीन असे त्यांच्या शपथेत लिहलेले असते.म्हणजे त्यांनी खोटी शपथ घेतल्याचेही सिद्ध होते.या सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेतच तसेच आम आदमी पार्टीच्यावतीने उच्च न्यायालयात सामान्य नागरिकांसाठी जाऊन न्याय मागणार आहोत असेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेस नागनाथ पोवार,जयवंत पोवार,संदीप देसाई,नारायण पाटील,निलेश रेडेकर,उत्तम पाटील,अप्पासाहेब कोकितकर,पंडित पाटील,प्रशांत अवघडे,सुरेश पाटील,आनंद वणीरे,रियाज उस्ताद आणि आम आदमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!