भाजपाच्या वतीने घेण्यात आलेला पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

 

IMG_20160712_223827कोल्हापूर:दि. ८, ९, १० जुलै २०१६ रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने कणेरी मठ येथे ०३ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. दि. ८ जुलै २०१६ रोजी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव इत्यादी प्रमुख़ नेत्यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण वर्गाचे उदघाट्न सत्र संपन्न झाले. याप्रसंगी पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या ह्स्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते या वर्गाला संबोधीत करणार असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार समजुन घेवुन संघट्ना विस्तारासाठी प्रयत्नशील व्हावे. आमदार अमल महाडीक यांनी कार्यकर्त्यांनी वेळेचे महत्व जाणुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न तडीस न्यावेत असे आवाहन केले. यानंतर दि.८ जुलै २०१६ रोजीच्या सत्रांमध्ये “कार्यकर्ता व्यक्तीमत्व विकास”, “अ.भ.वि.प….भा.ज.यु.मो…भाजपा”,  “संघ विचार परिवार” इत्यादी विषयांवर अनुक्रमे महेश जाधव(भाजपा माजी जिल्हाध्यक्ष) , शंकरराव कुलकर्णी सर(निवृत्त प्राध्यापक), भगतरामजी छाबडा (जिल्हा संघ चालक) या वक्त्यांनी त्यांच्या विषयांवर अतीशय मार्मीक विवेचन केले. दि.९ जुलै २०१६ रोजीच्या सत्रांमध्ये काडसिद्धेश्वर महाराज (मठाधीपती कणेरी मठ), डॉ. भालचंद्र साठे (सामाजिक कार्यकर्ते), शरद बुट्टे-पाटील (जि.प.सदस्य पुणे ग्रामीण) उदय सांगवडेकर (प्रांत सदस्य बौद्धीक विभाग) मकरंद देशपांडे ( प्र.का.सदस्य भाजपा) रघुनाथ कुलकर्णी (माजी प्रदेश संघटन मंत्री) या नामवंत वकत्यांनी “अध्यात्म व राष्ट्रवाद”, “स्वयंसेवी संस्था नोंदणी व कार्य”, “शासकीय योजना”, “संघ परिवार विविध प्रकल्प” “भारतीय जनता पार्टीचा इतिहास”, “पार्टीची कार्यपद्धती” या विविध विषयांवर मौलीक मार्गदर्शन केले. दि.१० जुलै २०१६ रोजीच्या सत्रांमध्ये केशव उपाध्ये(प्रदेश प्रवक्ते),  नाम.चंद्र्कांतदादा पाटील (महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक) माधव भंडारी (मुख्य प्रवक्ते प्रदेश भा.ज.पा) या वकत्यांनी सोशल मिडीया, केंद्र व राज्य शासनाची उपलबद्धी, निवडणुक व्यवस्थापन, एकात्म मानव दर्शन या विषयांवर आपले अनुभव संपन्न विचार मांडले. तीन दिवस चाललेल्या या सत्राची सांगता मा.माधवजी भंडारी यांच्या शेवट्च्या सत्राने करण्यात आली. या निवासी अभ्यास वर्गास १५५ अभ्यागत उपस्थित होते. यामध्ये भाजपा पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांची प्रमुख़ उपस्थिती होती. या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी केले. वर्ग गीत जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी सांगीतले. आभार प्रदर्शन माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केले. हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी होण्यासाठी भाजपा पदाधिकारी विजय जाधव, श्रीकांत घुंटे, अमोल पालोजी, मारुती भागोजी, गणेश देसाई, हर्षद कुंभोजकर, नचिकेत भुर्के, सयाजी आळवेकर, गिरीष गवंडी, सौ मधुमती पावनग़डकर, अ‍ॅड. अमीता कुलकर्णी, सौ भारती जोशी, अक्षय मोरे, पारस पलिचा, विजय सुतार, सुजय मेंगाने, धनजंय जरग इत्यादी प्रमुख़ कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!