
कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 45 फुट 6 इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. यापुढेही पुराचा धोका असणाऱ्या भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे.
पंचंगंगा नदीला पुर आल्यामुळे कोल्हापूर शहरातील सुतारमळा आणि कुभारगल्ली या वस्त्यामध्ये पाणी शिरल्याने तेथील 59 कुटुंबातील 253 लोकांना चित्रदुर्गमठ, मुस्लिम बोर्डिंग आणि अंबाबाई विद्यालय या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. यापुढेही पुराच्या पाण्याचा धोका असणाऱ्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या कामास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने प्राधान्य दिले आहे.
Leave a Reply