
एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या जवळपास 280 हून अधिक कुटुंबातील जवळपास 1400 लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
यामध्ये प्रयाग चिखली येथील 15 कुटुबातील 48 व्यक्ती, वळीवडे येथील 25 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कवठेसार येथील 65 कुटुंबातील सुमारे 211 लोकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि घुणकी येथील 126 कुटुंबातील 650 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. भुदरगड तालुक्यातील शेणगांव येथील 6 कुटुंबातील 24 लोकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी येथील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने 15 लोकांना केकतवाडीयेथे स्थलांतरीत करण्यात आले.
पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 45 फुट 6 इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील 107 कुटुंबातील 463 लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. यापुढेही पुराचा धोका असणाऱ्या भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनाने गतीमान केले आहे.
एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक जिल्ह्यात रात्रीच दाखल झाले असून 42 जवानांच्या या पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट अलोककुमार हे आहेत. यांच्या नेवृत्वाखाली या पथकाचे दोन गट तयार करण्यात आले असून शोध, बचाव व मदत कार्यासाठी ही पथके कार्यरत आहेत. रात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ दोन ट्रक पाण्यात गेल. त्यातील चार जणांना या पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच पाण्यात गेलेली इन्होवा कारही या पथकाने बाहेर काढली. याबरोबरच सकाळी आंबेवाडी येथील वडणगे रोडवरील शिवपार्वती यात्री निवासातील 8 लोकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. आंबेवाडी येथे पाण्यात गेलेल्या दोन लहान मुलांना या पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. एकजण बेपत्ता असून त्याचा शोध पथकामार्फत सुरु आहे. तर पुलाची शिरोली येथील गवत कापण्यासाठी गेलेल्या दोन जण पुराच्या पाण्यात अडकल्याने झाडावर थांबले होते. त्याही दोन जणांना या पथकाने सुरक्षितरित्या हालविले. या पथकातील जवानांबरोबर जीवनज्योत सेवा संस्थेच्या 10 जवानांनी सहभाग घेतला.
Leave a Reply