कोल्हापूर :गेल्या २ वर्षात परप्रांतीय लोकांचा ओढा महाराष्ट्रात वाढलेला आहे.ते लोक आपल्या जमिनी कवडी मोलाने घेतात आणि आपले साम्राज्य वाढविताना दिसतात पण याला सर्व गोष्टींना आपणही तेवढेच जबाबदार आहोत.हे असेच चालू राहिले तर मराठा समाजावर अल्पसंख्याक म्हणून सवलती मागण्याची वेळ येईल यासाठी संघटीत होऊन आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे मत आमदार नितेश राणे यांनी मराठा समाज गोलमेज परिषदेत काढले.अखिल भारतीय मराठा महासंघ,महाभारत ग्रुप,क्षत्रिय मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आज कोल्हापुरात पहिली मराठा गोलमेज परिषद घेण्यात आली.शिवाजी महाराजांचे बहुतांशी गड आणि किल्ले हे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आहेत.सह्याद्रीच्या भूमीत अनेक दुर्मिळ वनस्पती,जंगल,वनसंपदा आहे.नद्यांच्या उगमामुळे अर्ध्या भारताचा सह्याद्री पोशिंदा आहे.याच सह्याद्रीला नष्ट करण्याचा घाट घातला जातोय.महाराष्ट्राबाहेरील खाण कामगार त्याचे उत्खनन करत आहेत.मराठा समाज वाचवायचा असेल तर शिवरायांची कर्म आणि धर्म भूमी सह्याद्रीला आधी वाचविले पाहिजे असे उद्गार पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी काढले.मराठा समाजात जास्त लोक शेती करतात पण सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.पर्यायाने मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन शेतकरी आत्महत्या करत आहे.सरकारला पाकिस्तानी गायक,खेळाडू चालत नाही मग तिथून कांदा आयात करणे कसे चालते असा सवाल शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी काढले.
मराठा समाजावर अन्याय करण्यासाठी ज्यांनी विडा उचलला आहे त्यांना प्रती उत्तर देऊ शिक्षणात मराठ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही,जमिनी परप्रांतीय लाटत आहेत.हे होऊ देणार नाही असे प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई यांनी परखड मत व्यक्त केले.लॅ
ड माफिया बाहेरून येतात त्यांना थांबवायला पाहिजे यासाठी एकत्रित लढा दिला पाहिजे असे आड दिलीप पाटील यांनी सांगितले.मराठ्यांच्या इतिहासाची नेहमीच तोडफोड झाली.चुकीचे मुद्दे घालणे,खरा इतिहास पाठ्यपुस्तकातून गाळणे या गोष्टी नेहमीच घडतात.मराठा सत्तेचा उत्कर्ष या न्यायमूर्ती रानडे लिखित पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अश्लील भाषा वापरली आहे त्या पुस्तक विक्रीवर बंदी आणावी असा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या वतीने रामदासस्वामी यांनी शिवरायांना घडविले.ते त्यांचे अंकित होते असे रामदासस्वामी यांचे उदात्तीकरण केले जाते.ते थांबवायला पाहिजे.असाही सूर परिषदेत निघाला.
ज्येष्ठ लेखक आणि इतिहास तज्ञ बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराज यांच्यावर चार खंडाचे १६३० विस्तृत चरित्र प्रथम कोल्हापुरात लिहिले.त्याचे संपादकीय काम पूर्ण झाले असून ते पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे असे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.मराठा समाजातील मुलांनी सैन्य दलात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.शहीद सुद्धा झाले आहेत.पण संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सातारा येथे एकाच सैनिकी स्कूल आहे.अजून सैन्य प्रशिक्षण शाळा सरकारने सुरु कराव्यात.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,शेतीमाल निर्यातीवर बंदी घालावी,शेतकऱ्यांच्या जमिनी फसवून घेतल्या जातात त्यासाठी सरकारण कडक कायदे करावेत,मराठा समाजातील गरजू आणि होतकरू विद्यर्थ्याना अल्प दरात कर्ज मिळावे,मराठा भवनची उभारणी व्हावी यासह अनेक ठराव मराठा समाजाच्या हितासाठी मंजूर करण्यात आले.यावेळी शशिकांत पवार (अप्पा), राजेंद्र कोंढरे, दिलीपदादा जगताप, वसंतराव मुळीक(नाना), इंद्रजीत सावंत, प्रवीणदादा गायकवाड़, कामाजि पवार, मराठा उद्योजक, अधिकारी, व मराठा समाज संघटनांचे प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply