कोल्हापूर : बुरहान वानी या कट्टर जिहादी आतंकवाद्याला आणि देशद्रोह्याला भारतीय लष्कराने ठार केल्याच्या दिवसापासून काश्मीरमध्ये हिंसाचार निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संपुर्ण देशांत अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपुर्ण घटणेचा निषेध करण्यासाठी व भारतीय लष्कराच्या पाठीशी राहण्यासाठी आज दि. २१ जुलै २०१६ रोजी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुरहान वानी याच्या पुतळ्याला कोल्हापूरी चपलेचा प्रसाद देऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी प्रास्तावीक करताना जिल्हा उपाध्याक्ष हेमंत आराध्ये म्हणाले की, जिहादी आतंकवादी बुरहान वानी याचा शिरच्छेद भारतीय लष्कराने केल्यानंतर गेले आठ दिवस काश्मिर खोरे अशांत आहे. या घटनेचे पडसाद संपुर्ण देशात उमटत असताना भारतीय लष्कराचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांच्या मनोगतामध्ये काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. गेल्या साठ वर्षात ज्या कॉंग्रेसने मतांच्या राजकारणासाठी जातीय समीकरणे मांडली त्याचाच परिपाक म्हणजे आजही स्वतंत्र भारतामध्ये भारत विरोधी घोषणा व कारवाया केल्या जात आहेत परंतु देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी सत्ता हातात घेतल्यापासून लष्कराला आतंक्यांच्या एका गोळीस दहा गोळ्या या पध्दतीने प्रत्युत्तर देण्यास सांगीतले आहे त्यामुळेच आतंकी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे असे नमुद केले.
भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या मनोगतामध्ये प्रथमत: आतंकी व फुटीरतावादी विचारांचा जाहिर निषेध केला. भारतीय लष्कराचे असंख्य जवान भारताच्या सीमांवर अहोरात्र पहरा देत असल्यामुळेच संपुर्ण भारतीय नागरीकांचे संरक्षण होते परंतु जिहादी आतंकवादी बुरहान वानी याचा शिरच्छेद भारतीय लष्कराने केल्यानंतर काशिमरच्या घाटीमध्ये या आतंक्याला हीरो बनवुन त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न स्वतंत्र भारतात काही देशद्रोही विचारांची लोक करीत आहेत त्यामुळे या सर्वच घटनांचा जाहीर निषेध केला.
याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “अगर इस देश में रहना होगा, वंदे मातरम केहना होगा”, “आतंकी व फुटीरतावादी विचारांचा धिक्कार असो,” “भारत माता की, जय” अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणुन सोडला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, दिलीप मेत्राणी, सुरेश जरग, नगरसेवक किरण नकाते, नचिकेत भुर्के, जयराज निंबाळकर, विजय आगरवाल, तौफीक बागवान, इकबाल ह्कीम, संजय सावंत, विवेक वोरा, विवेक कुलकर्णी, गिरीष गवंडी, अक्षय मोरे, गोविंद पंडीया, निलेश आजगांवकर, रविंद्र घाटगे, पपेश भोसले, धैर्यशील देसाई, विजय सुतार, अॅड.संपतराव पवार, विठोबा जाधव, सौ भारती जोशी, मधुमती पावनगडकर, सुनिता सुर्यवंशी, आकुताई जाधव, शशिकला मोरे, रेखा वालावलकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply