
कोल्हापूर :-दुनियादारी फाउंडेशन च्या वतीने यावर्षी पासून स्वराधीश सुधीर फडके पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील उत्तुंग कमगिरीबद्दल तर सामाजिक पुरस्कार आनंदवन या संस्थेला देण्यात येणार आहे.हा पुरस्कार स्विकारण्यासाठी स्वतः आमटे कुटुंबीय उपस्थित राहणार आहे.बाबूजींच्या संगीताची जादूच अशी मोहक आहे.’’सुधीर फडके’’ या ध्येयवेड्या माणसानं अत्यंत खडतर प्रवासातून आपले ध्येय साध्य केले.त्यांच्या कठोर तपश्चर्येचे फळ त्यांच्या सांगितिक प्रवासातही उमटले आहे.या प्रवासातील पाऊलखुणांता साक्षी ठेवत स्,गाण्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या स्वाभिमानी कलाकाराच्या नावाने आम्ही ‘दुनियादारी फाउंडेशन’ या वर्षापासून (सन २०१६) पुरस्कार सुरु करुन त्यांच्या कार्याला नमन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’स्वराधीश सुधीर फडके पुरस्कार’’ असे या पुरस्काराचे नाव असणार आहे.या नावाने संगीत/कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एका कलाकाराचा रोख ५१,०००/- आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.असे संस्थेचे अध्यक्ष समीर सप्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच प्रोत्साहन पर पुरस्कार ऑर्गन च्या पुनरूत्थाणासाठी प्रमाणिक प्रयत्न करणाऱ्या बाळ दाते यांना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या 4 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे मान्यवारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमास पं तुलसीदास बोरकर,श्रीधर फडके ,प्रशांत दामले, मृणाल देव कुलकर्णी, सिमा देशमुख, श्रीरंग देशमुख, श्रीधर माडगुलकर, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर आणि उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. असे प्रसाद कारुलकर यांनी सांगितले. कार्यक्रमात संगीत रजनी मधे सुधीर फडके यांची गाणी पुरस्कारित मान्यवारांच्या मुलाखती आणि सुधीर फड़के यांचे किस्से सांगितले जातील. असा भरगच्च कार्यक्रम आयोजीत केला आहे. असे शैलेश देशपांडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस ऐश्वर्या मुनीश्वर शिल्पा पाटील, शांतनु पाटील आणि फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply