
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनी स्थानीक स्वराज्य संस्था बळकट आणि सक्षम व्हाव्यात या उद्देशाने महत्वपुर्ण पावले उचलली आहेत. स्मार्ट सीटी, अमृत योजना, ह्रद्य योजना यासारख्या योजना शहरी व ग्रामीण नगरपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका यांना बळकट करण्यासाठी आखलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार करुन या राज्यामध्ये वेळोवेळी नगरपालीकेची व महापालीकेची हद्दवाढ झाली आहे. महापालीका क्षेत्राची हद्दवाढ होणे ही कायदेशीर व सरकारी प्रक्रीया आहे. या राज्यात गेल्या ४० वर्षात जवळपास ७० ट्क्के महापालीकांची ३ पेक्षा जास्त वेळा हद्दवाढ झालेली आहे याला अपवाद कोल्हापूर महानगरपालीका आहे हे दुर्देवाने व खेदाने सांगावे लागते.
आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहीजे या आग्रही मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधीकारी यांच्या कार्यालयाच्या दारात स्टेज टाकून “हद्दवाढ झालीच पाहिजे” या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराच्या सर्व जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपा कोल्हापूर महानगर नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. ज्यावेळी महालक्ष्मी मंदीर प्रवेशद्द्वाराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन केले व त्याला यश मिळाले. मग प्रश्न टोल मुक्तीचा असो किंवा वाढीव पाणी बील, घरफाळा या सर्वच प्रश्नांत विरोधी पक्षात असताना कोल्हापूर भाजपाने आक्रमक व तीव्र भुमीका घेऊन रस्त्यावर उतरूण आंदोलने केली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महसुल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा मुळचा कार्यकर्त्याचा पिंड हा लढवय्या स्वरुपाचा आहे. सुदैवाने पालक मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत धाडसी व सकारात्मक निर्णय कोल्हापूरच्या विकासाबाबतीत घेतलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महसुल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळेच आज कोल्हापूर टोलमुक्त झाले. थेट पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावला, अमृत योजनेमार्फत १६५ कोटींची योजना मंजुर झाली, क्न्यागत पर्वासाठी १२० कोटींचा निधी मिळाला, जिल्हातील रस्त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला. आज याच धर्तीवर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर केंद्र व राज्य सरकार कडून शहरासाठी भरघोस निधीतर मिळेलच त्याचबरोबर कोल्हापूर शहराची सामाजीक, औद्योगीक प्रगती वेगाने होईल.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने आज पासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व जिल्हा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु आहे.
याठिकाणी “झालीच पाहिजे…झालीच पाहिजे…कोल्हापूरच्या सर्वांगीन विकासासाठी.हद्दवाढ झालीच पाहिजे”, “हद्दवाढीचा वादा…पालक मंत्री चंद्रकांतदादा” “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा असंख्य घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्ह्णाले की, हद्दवाढ व्हावी ही पक्षाची अधिकृत भुमीका असुन शासकीय दरबारात याविषयी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे. आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय प्रखरतेने सरकारच्या नजरेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
माजी जिल्हाध्यक्ष व प्र.का.सदस्य महेश जाधव म्ह्णाले की, भाजपा कोल्हापूर हे सुरवातीपासुनच कोल्हापूरच्या प्रलंबीत प्रश्नांबाबत जागृत असून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीच कोल्हापूर शहराला भरघोस मदत केलेली आहे. आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. या हद्दवाढीमुळे कोल्हापूरची औद्योगीक प्रगती निश्चित आहे. विरोधासाठी विरोध न करता हद्द्वाढ होऊ देणे हे इथल्या सर्व नागरीकांचे आद्य कर्तव्य आहे असे सांगीतले.
सरचिटणीस अशोक देसाई यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची माहिती आपल्या भाषणात दिली व हद्दवाढ न झाल्यास शहराच्या नागरी समस्या आणखीन गंभीर होतील असे नमुद केले.
माजी नगरसेवक आर.डी.पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालीकेची सध्याची अवस्था हद्दवाढ न झाल्यामुळे बंद पडलेली गाडी अशी झाली आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली नाही तर महानगरपालीकेचे अस्तीत्व धोक्यात येईल असे नमुद केले.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी हद्दवाढी नंतर कोल्हापूर शहराला मिळणार्या विविध निधीची व योजनांची माहिती दिली व हि हद्दवाढ शहराच्या सुशोभीकरणासाठी किती उपयुक्त आहे हे नमुद केले. आजच्या दिवशी हद्दवाढ हा एकच पर्याय असल्याचे त्यांनी नमुद केले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालीकेचे भाजपा नगरसेवक, भाजपा प्रमुख पदाधिकारी यांनी हद्दवाढी विषयी घोषणा देऊन विचार मांडून हद्दवाढ झालीच पाहिजे या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सुरुवात केली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष, प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस संतोष भिवटे, अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, आर.डी.पाटील, नगरसेवक संभाजी जाधव, आशीष ढवळे, विजय सुर्यवंशी, सौ उमा इंगळे, किरण नकाते, सौ सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे, किरण नकाते, अॅड.संपतराव पवार, सुरेश जरग, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, दिलीप मेत्राणी, अशोक कोळवणकर, हर्षद कुंभोजकर, सयाजी आळवेकर, विशाल शिराळकर, संतोश माळी, राजु मोरे, अशोक लोहार, ओंकार जोशी, गणेश खाडे, संदीप कुंभार, पपेश भोसले, तानाजी निकम, संतोष माळी, तौफीक बागवान, राहुल धनवडे, नचिकेत भुर्के, विवेक कुलकर्णी, ज्ञानदेव पुंगावकर, विजाय आगरवाल, सतीश पाटील(घरपणकर), अशोक लोहार, दिग्विजय कालेकर, पारस पलीचा, अक्षय मोरे, विवेक वोरा, विजय सुतार, सौ वैशाली पसारे, रेखा वालावलकर, भारती जोशी, कविता मोरे, सुधाकर भागवत, शशिकांत रणवरे, बाळासाहेब मुळीक, गोविंद पांडीया, नितीन निकम आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply