
कोल्हापूर: जे.एस.टी.ए.आर.सी ही कोल्हापुरातील स्वसरंक्षणासाठी तायक्वांदोचे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून ही संस्था कोरीया येथील ‘कोरियाफेस्ट’ या कार्यक्रमात सहभागी होते व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते.या वर्षीही या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी कु.अंकूष नागदेव व कु.जयकुमार करदानी आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी झाले होते.कोल्हापूरचा संघ भारताचे कोरिया येथे तायक्वांदो स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी झाला होता.मुख्य संघाच्या इतर संघाच्या बरोबरीने हा संघ सहभागी झाला होता. या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने घवघवीत यश संपादन करत २ सुवर्ण,१ रौप्य आणि १ कास्यपदक मिळविले.ही स्पर्धा कोरियातील तायक्वांदो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वान मुजु पार्क येथे पार पडली. स्पर्धेत ३४ विविध देशातून १७०० स्पर्धक सहभागी झाले होते.यात अंकुश नागदेव याने फाईट,पुमसे या गटात सुवर्ण आणि कास्य पदक तर जयकुमार कारदानी याने सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले.भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोल्हापुरातील हे खेळाडू कोरिया येथे रवाना झाले होते.ही जागतीक स्पर्धा दि.१४ जुलै ते २३ जुलै या दरम्यान कोरिया येथे झाली.त्याचबरोबर कोरिया स्पर्धेतील सहभागा बरोबरच तेथील तायक्वांदो प्रशिक्षण माहिती आत्मसात करणे आणि तेथील तायक्वांदो हेड क्वार्टर कुकीआॅन या राष्ट्रीय तायक्वांदो प्रात्यक्षिक संघाकडून प्रात्याक्षिके पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधीदेखील या संघास मिळाली.या संघास जे.एस.टी.ए.आर.सीचे प्रमुख आणि तायक्वांदो तज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.
Leave a Reply