
कोल्हापूर : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट(मिटसॉग)पुणे यांच्या वतीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय पहिल्या नॅशनल टिचर्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यातील कोथरूड येथील प्रांगणात ही परिषद होणार आहे.शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविणे हा या परिषदेमागील उद्देश आहे.अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा.नंदकुमार निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महाराष्ट्र शासन,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद,मुनष्यबळ विकास मंत्रालय,भारत सरकार,असोसिएशन ऑफ इंडियन युनिवर्सिटीज,भारतीय छात्र संसद फौंडेशन,महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन आणि विश्वशांती केंद्र,आळंदी,युनेस्को अध्यासन,हॉवर्ड बिझिनेस स्कूल क्लब ऑफ इंडिया या सर्व संस्थांच्या सहकार्यातून ही पहिली परिषद होत आहे.संपूर्ण देशभरातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८ हजार शिक्षक यात सहभागी होणार आहेत.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिषदेचे मुख्य प्रवर्तक आहेत.परिषदेत होणाऱ्या सात सत्रांमध्ये भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास सद्यस्थिती,भवितव्य,शैक्षणिक खर्च,शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव,सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मुल्यांचा समावेश आहे का अशा अनेक विषयांवर संवाद आणि त्यातून चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग,माजी केंद्रीय शिक्षण मंत्री कपिल सिब्बल,तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे,अभिनेता आमीर खान,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शैक्षणिक,राजकीय,सामाजिक,कला,पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.असे माईर्स आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय पुणे चे प्राचार्य डॉ.टी.एन.मोरे यांनी सांगितले.केवळ शिक्षक म्हणून नाही तर उत्तम संशोधक,संवेदनशील,सामाजभिमुख,प्रगतीशील,दिशादर्शक,प्रेरणादायी,आणि तत्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असेही ते म्हणाले. या राष्ट्रीय परिषदेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर,चेअरमनपदी ज्येष्ठ डॉ.शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर,कार्यध्यक्ष संगणकतज्ञ डॉ.विजय भाटकर,कार्यकारी चेअरमन डॉ.विश्वनाथ कराड आणि सदस्य मिलिंद कांबळे आणि मुख्य समन्वयक प्रा.राहुल कराड आहेत.पत्रकार परिषदेला महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालय,पुणे चे प्राचार्य बी.एस.कुचेकर,प्राचार्य असोशिएशनचे अध्यक्ष प्रा.क्रांतीकुमार पाटील यांच्यासह शिक्षक आणि तज्ञ उपस्थित होते.
Leave a Reply