
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या दि. २२ जुलै २०१६च्या शासन निर्णयानुसार विविध शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यस्थ संस्थांची नामिका सूची तयार करण्यात आली असून त्यामध्ये सिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. शिंदे म्हणाले, सद्यस्थितीत नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत सिमीत प्रमाणात योजनेचे मूल्यमापन करण्यात येते. मूल्यमापनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने तसेच नमुना पाहणी व सांख्यिकी विषयाबाबत शासनाच्या विभागांना व कार्यालयांना सल्ला देऊ शकेल अशा सक्षम व नामांकित संस्थांची नामिका सूची तयार करण्यात आली आहे. या सूचीमध्ये शासन सहाय्यित संस्था- १० पेक्षा कमी जिल्ह्यात किंवा एका महसुली विभागासाठी (गट-२ प्रकार-२) शिवाजी विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या केवळ दोन अकृषी विद्यापीठांचा समावेश आहे.या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचेकाम अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रा. डॉ.व्ही. बी. ककडे यांनी केले. यामध्येअर्थशास्त्र विभागातील डॉ. एम.एस.देशमुख, संख्याशास्त्र, पर्यावरणशास्त्रआणि अभियांत्रिकी विभागामधील डॉ.डी.एन. काशीद, संतोष सुतार, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. गिरीश कुलकर्णी यांचातज्ज्ञ म्हणून समावेश करण्यात आलाअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply