
कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्थानीक स्वराज्य संस्था बळकट आणि सक्षम व्हाव्यात या उद्देशाने महत्वपुर्ण पावले उचलली आहेत. स्मार्ट सीटी, अमृत योजना, ह्रद्य योजना यासारख्या योजना शहरी व ग्रामीण नगरपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका यांना बळकट करण्यासाठी आखलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार करुन या राज्यामध्ये वेळोवेळी नगरपालीकेची व महापालीकेची हद्दवाढ झाली आहे. महापालीका क्षेत्राची हद्दवाढ होणे ही कायदेशीर व सरकारी प्रक्रीया आहे. या राज्यात गेल्या ४० वर्षात जवळपास ७० ट्क्के महापालीकांची ३ पेक्षा जास्त वेळा हद्दवाढ झालेली आहे याला अपवाद कोल्हापूर महानगरपालीका आहे हे दुर्देवाने व खेदाने सांगावे लागते.
काल पासुन भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने जिल्हाधीकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. सकाळी ११ वाजलेपासून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहीजे या आग्रही मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधीकारी यांना भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर केंद्र व राज्य सरकार कडून शहरासाठी भरघोस निधीतर मिळेलच त्याचबरोबर कोल्हापूर शहराच्या पायाभुत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळेल त्याचप्रमाणे या हद्दवाढीमध्ये गोकुळ शिरगांग औद्योगीक वसाहत व शिरोली औद्योगीक वसाहतींचा समावेश व्हावा अशी आग्रही मागणी केली.
माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्ह्णाले की, आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. गेली ४० वर्षे या शहराची एक इंचही वाढ झालेली नाही त्याचप्रमाणे गेली ४० वर्षे ही हद्दवाढ व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी विशेष आग्रही आहे परंतु ग्रामीण भागातील नागरीकांची दिशाभुल करुन हा प्रश्न कायमच मतांच्या राजकारणासाठी टांगता ठेवलेला आहे. कोल्हापूर शहराच्या नजीक असणार्या अनेक ग्रामपंचायती महानगरपालीकेच्या सर्व सोईसुवीधांचा लाभ घेतात परंतु खर्या अर्थाने पायाभुत सुविधांमध्ये विकासाची महागंगा येत असताना संबंधीत पुढार्यांच्या भुलथापांना बळी पडतात.
माजी नगरसेवक आर.डी.पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालीकेची सध्याची अवस्था हद्दवाढ न झाल्यामुळे बंद पडलेली गाडी अशी झाली आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली नाही तर महानगरपालीकेचे अस्तीत्व धोक्यात येईल असे नमुद केले.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी हद्दवाढी नंतर कोल्हापूर शहराला मिळणार्या विविध निधीची व योजनांची माहिती दिली व हि हद्दवाढ शहराच्या सुशोभीकरणासाठी किती उपयुक्त आहे हे नमुद केले. आजच्या दिवशी हद्दवाढ हा एकच पर्याय असल्याचे त्यांनी नमुद केले.
सरचिटणीस अशोक देसाई यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची माहिती आपल्या भाषणात दिली व हद्दवाढ न झाल्यास शहराच्या नागरी समस्या आणखीन गंभीर होतील असे नमुद केले.
याप्रसंगी नगरसेवक संभाजी जाधव, अजित ठाणेकर, किरण नकाते, सुनील कदम, सत्यजीत उर्फ नाना कदम, उमा इंगळे, ताराराणी आघाडीचे सरचिटणीस सुहास आण्णा लटोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, अशोक कोळवणकर, गणेश देसाई, सौ भारती जोशी, सौ प्रभा टिपुगडे, सौ रेखा वालावलकर, सौ वैशाली पसारे, सौ सुनीता सुर्यवंशी, नचिकेत भुर्के, कुलदीप देसाई, सुरेश जरग, संतोष माळी, गणेश खाडे, विजय आगरवाल, संदीप कुंभार, पपेश भोसले, तानाजी निकम, नझीर देसाई, अशोक लोहार, महेश मोरे, दिग्विजय कालेकर, पारस पलीचा, अक्षय मोरे, विजय सुतार, गोविंद पांडीया आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply