
कोल्हापूर : हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आज सर्व पक्ष तसेच हद्दवाढ कृती समितीच्यावतीने काल कोल्हापूर बंदची हाक दिली त्याला आज कोल्हापुरकारांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.शहरातील सर्व दुकाने,केएमटी बस सेवा सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आले.हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.पण काही रिक्षा संघटना मात्र यात सहभागी झाल्या नाहीत.सकाळी महाद्वार रोड आणि शिवाजी रोड येथे काही व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली.त्यामुळे कोल्हापूरचे शांततेने चाललेल्या आंदोलनास काहीसे हिंसक वळण लागले.यानंतर संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. गेली ४२ वर्षे प्रलंबित रहिलेला हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढून हद्दवाढीची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी जारी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Leave a Reply