
मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 1ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 56 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 7नोव्हेंबर, 2016 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच14 व्या बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 5 डिसेंबर, 2016 पासून एकूण पाच महसूली विभागात आयोजित करण्यात येणार आहे. हिंदी, संगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा जानेवारी 2017मध्ये आयोजित करण्यात येतील. बालनाट्य वगळता इतर नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- तसेच बालनाट्य स्पर्धेकरीता रु.1,000/-इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धकसंस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्याwww.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात
Leave a Reply