शाळाबाह्य मुलांसाठी अवनि संस्थेस हस्ते बस प्रदान

 

IMG_20160731_182203कोल्हापूर : विटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या अवनी संस्थेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी 40 असनी बस काल प्रदान करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका काल संपन्न झाल्या. त्यानंतर अवनि संस्थेस पालकमंत्र्यांच्या हस्ते 40 असनी बस प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अवनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, संस्थेचे संचालक संजय पाटील व परिसर विकास भगिनी उपस्थित होत्या.
अवनि संस्थेने शाळाबाह्य मुलांसाठी हाती घेतलेला उपक्रम महत्वाचा असून जिल्ह्यातील विटभट्टी व ऊसतोड मजूरांच्या शाळाबाह्य मुलांसाठी या बसची सुविधा उपयुक्त ठरेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी या बसमधून पालकमंत्री पाटील यांनी परिसरातून फेरफटकाही मारला. समाजातील दानशूर व्यक्तीकडून मिळणाऱ्या मदतीतून या बसचा इंधन आणि चालकाचा खर्च केला जाणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!