आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि हिंदु धर्म संघटनच्या वतीने “श्रावण व्रत वैकल्य”

 

IMG_20160731_172309कोल्हापूर: कोल्हापुरातील सर्व हिंदु प्रेमी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन च्या वतीने हिंदु धर्मियांना पवित्र असणाऱ्या श्रावण मास आणि श्रावणातील पहिला सोमवार याचे औचित्य साधून येत्या पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत श्रावण व्रत वैकल्य हा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.मंगळावर पेठ येथील दैवज्ञ बोर्डिंग सभागृहात हा समारंभ आयोजित केला आहे असे हिंदु धर्म संघटक आड.सुधीर जोशी वंदुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या ३ वर्षापासून हा आगळा वेगळा समारंभ करवीर नगरीत होत आहे.यंदाचे हे चौथे वर्ष असून यशस्वीरीत्या गेली ३ वर्षे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली असून कार्यक्रमाची सुरुवात संकल्प यज्ञ द्वारे होणार असून यासाठी पंचगंगा तीरावरुन कावडीने पाणी आणले जाणार आहे.१०१ महिलांचे सामुदायिक महिम्न पठण हे या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिठ्य आहे.सायंकाळी विधिवत प्रथेप्रमाणे १०८ जोडपी भोजन ग्रहण करून उपवास सोडतील.त्यानंतर सुमारे ५ हजार उपस्थित आपला उपवास सोडतील.असे किशोर घाटगे यांनी सांगितले. एस्कोन च्या वतीने गो माता पूजन,प्रजापिता ब्रह्मकुमारीच्यावतीने भजन अशा धार्मिक वातावरणात हा समारंभ पार पडणार आहे.कार्यक्रमास करवीर पीठाचे शंकराचार्य,वारकरी संप्रदायाचे भानुदास यादव,आरएसएस चे अण्णा ठाकूर,शिवाजीराव ससे,बाबा वाघापुरकर,हिंदु धर्मातील सर्व जाती पोटजाती जमाती,मंदिर प्रमुख,तालीम संस्था प्रतिनिधी,सदस्य,महापौर,उपमहापौर,आमदार,खासदार,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,आयुक्त,नगरसेवक,हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शहरातील मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे.श्रावण या पवित्र महिन्यातील पहिल्या सोमवारी हिंदु धर्म परंपरेनुसार उपवास सोडण्याचा क्षण एकत्रितपणे अनुभवता यावा यासाठी तसेच हिंदु परंपरा जोपासण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविला जाणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!