बहुचर्चित ‘वायझेड’ येत्या १२ ऑगस्टला होणार प्रदर्शित

 

IMG-20160730-WA0016मुंबई: एकापेक्षा एक सरस कलाकार आणि कथासूत्र तसेच मांडणी व फ्रेश लुक यामुळे आधीपासूनच बहुचर्चेत असणारा वायझेड हा चित्रपट येथ १२ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.डबलसिट आणि टाईम प्लीझ फेम समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन हे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.एव्हरेस्ट एन्टरटेनमेंटचे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनिश जोग यांची ही निर्मिती असून नुकत्याच झालेल्या शानदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लौंच करण्यात आला.हा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर गाजत आहे. टवटवीत कथा आणि आपल्याश्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखा विनोदाचा प्रसन्न शिडकावा हे समीर क्षितीज यांच्या दिग्दर्शनाचे वैशिठ्य या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे.या चित्रपटामुळे वाय आणि झेड चा अर्थ बदलणार आहे.सई ताम्हणकर,मुक्त बर्वे,सागर देशमुख,अक्षय टांकसाळ,पर्ण पेठ या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी छाप सोडली आहे.रीशिकेश जसराज आणि सौरभ यांचे संगीत असून चित्रपटातील गाणी आधीच लोकप्रिय झालेली आहेत.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे.एकूणच सर्व बाजूनी हा चित्रपट संपन्न असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच हा चित्रपट उतरेल असा विश्वास संपूर्ण टीमला वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!