
कोल्हापूर:एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर १३ व्या जेके टायर्स एफएमएससीआय नॅशनल रोटक्स कार्टिंग चॅम्पियनशिपची चौथी फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व फेरी यंदा कोल्हापुरात होत आहे.मोहितेज रेसिंग अकॅडमी येथे ही कार्टिंग स्पर्धा संपन्न होत आहे.अशी माहिती आर.एल.मोहिते इंडस्ट्रीजचे संचालक अभिषेक मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जेके टायर्स मोटर स्पोर्ट्स यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या जातात.सिनिअर मॅक्स,ज्युनिअर मॅक्स आणि मायक्रो मॅक्स या तीन प्रकारांमध्ये ७ ते १२,१२ ते १५ आणि १५ वर्षावरील अशा गटात या स्पर्धा घेतल्या जातात.कार्टिंग रेसचा थरार यावर्षी कोल्हापुरकारांना येत्या शनिवारी २० ऑगस्ट आणि रविवारी २१ ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळणार आहे.असेही अभिषेक मोहिते यांनी सांगितले.या स्पर्धेची अंतिम फेरी आक्टोंबर महिन्यात होणार आहे.विजेत्यांना ५० देशातील ३६० स्पर्धकांबरोबर रेस खेळण्याची संधी मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धा कोल्हापुरात होत आहेत.मोटर रेसिंगचा थरार पाहण्यासाठी कोल्हापुरकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.कोल्हापुरातून यंदा ज्याने २४३ पॉइंटस मिळवून तो ३ ऱ्या क्रमांकावर आहे असा कोल्हापूरचा खेळाडू ध्रुव मोहिते,चित्तेश मंदोद्य,प्रद्युम्न दानिगोड आणि कृष्णराज महाडिक हे सहभागी होणार आहेत.तसेच शाहान आली -२६२,रुहान अल्वा-२४६,अर्जुन नायर-२४१ मायक्रो मॅक्स गटात,मानव शर्मा-२५७,एन.उमाशंकर-२४८,यश आराध्या-२४० गुणांसह जुनिअर मॅक्स गटात आणि रिकी डोनिसन-२५२,विष्णू प्रसाद-२४७ आणि कोल्हापूरचा ध्रुव मोहिते-२४३ गुणासह सिनिअर मॅक्स गटात अग्रस्थानी आहेत.हे सर्व स्पर्धक कोल्हापुरात मोटोरेसिंगचा थरार दाखविणार आहेत. मोहितेज रेसिंग अकॅडमी चा रेसिंग ट्रॅक हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने या स्पर्धा म्हणजेच मोटोरेसिंगचा थरार कोल्हापुरात घेत आहोत असे मॅक स्पोर्ट्सचे संचालक अकबर इब्राहीम यांनी सांगितले.
Leave a Reply