
रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं पी.व्ही.सिंधूचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सिल्व्हर मेडलवर आपलं नावं कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार्या, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणार्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिनं सिंधूचा पराभव केला. असं असलं तरी रिओमध्ये ऐतिहासिक ‘रुपेरी’ कामगिरी करणार्या सिंधूने शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देत संपूर्ण देशवासियांची मनं जिंकली.पहिल्या गेममध्ये पिछाडीवर असताना 19 व्या गुणानंतर सिंधूने दमदार स्मॅशच्या जोरावर पुनरागमन केलं आणि पहिला गेम 21-19 असा जिंकला. त्यानंतर दुसर्या गेममध्ये मात्र कॅरोलिनाने चोख कामगिरी करत 21-12 असं पुनरागमन केलं. त्यामुळे सामना तिसर्या आणि निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. तिसर्या गेममध्ये दोघांमध्येही गुणांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण शेवटच्या गेममध्ये कॅरोलिनाने 21-15 अशी आघाडी घेत सामना जिंकून गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं. 21 वर्षांची पी.व्ही.सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय,
ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकून देण्याचा इतिहास सिंधूने घडवला आहे
Leave a Reply