
कोल्हापूर :- जे.के.टायर नॅशनल गो कार्टिंग चॅम्पीयनशिपच्या वरिष्ठ गटात सर्वोच्च स्थानावर रिकी डॉनीसनने सातत्याने कामगिरी केलेली आहे.भविष्यातील एशियन चॅम्पीयनशिप गो कार्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी रिकी डॉनीसन सज्ज झाला आहे.त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानासह इंजिनियरींग टिमचीही साथ लाभत आहे.या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष रिकी डॉनीसनने तिसऱ्या फेरी अखेर जे.के.टायर नॅशनल गो कार्टिंग चॅम्पीयनशिपमध्ये वरिष्ठ गटात सर्वोच्च स्थान कायम राखत लक्ष वेधून घेतले आहे.एशियन चॅम्पीयनशिपमध्येही पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला असून भविष्यात यामध्ये पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी तो मेहनतीने सराव करीत आहे.तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य याचा कस लागणाऱ्या या स्पर्धेमध्ये तंत्रज्ञान,आयत्यावेळी अचानकपणे निर्माण होणारी तांत्रिक समस्या,वातावरण याचाही परिणाम होत असतो मात्र आपल्या इंजिनियरींग टिमच्या सततच्या संशोधनपर मार्गदर्शनाच्या सरावात आपण कोठेही कमी न पडता सर्वोत्तम कामगिरी नोंदविण्याचा रिकी डॉनीसनचा निर्धार आहे.
Leave a Reply