
कोल्हापुर : महालक्ष्मी प्रतिस्थापनेस मागील वर्षी 300 वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधुन खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रोत्साहनाने श्री महालक्ष्मी देवी साठी सुवर्ण पालखी चा संकल्प केला गेला. यासाठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट यांच्याकडे एका वर्षात तब्बल 10 हजारहुन अधिक लोकांनी ऊस्फूर्तपणे सोने दान करत 16 किलो सोने जमा झाले. आता ही तयारी शेवटच्या टप्यात आली असून येत्या नवरात्रोत्सवापर्यंत पालखी पूर्ण होण्यासाठी अजुन 8 किलो सोने लागणार आहे. तरी दानशूर व्यक्ती तसेच कोल्हापुरातील प्रत्येक घरातून 1 ग्राम सोने जमा झाले तरी हा संकल्प पूर्ण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर लोकांनी सढ़ळ हस्ते सोने दान करावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसार मध्यमांच्याद्वारे केले.16 किलो म्हणजे 8 कोटी रूपयांचे सोने जमा झाले आहे. हि अभिमानाची गोष्ट आहे. यातून पालखीचे चवऱ्या, मोर,मोर्चेल आणि प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. अजुन 8 किलो सोने प्राप्त झाले कि पालखी पूर्ण होईल. तरी श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी साठी सोने दान करण्याची ही शेवटची संधी असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी कार्यध्यक्ष भरत ओसवाल,सचिव महेंद्र इनामदार,विश्वस्त समीर सेठ, के. रामाराव, जितेंद्र पाटील, नंदु मराठे,शिवप्रसाद पाटील यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.
Leave a Reply