कोल्हापूर: इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र करण्याकरितासार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते. बदलत्या आधुनिक युगामध्ये कोणतेही निमित्त साधून सेल्फी काढणे हा ट्रेंड झाला आहे. स्वत:च्या आयुष्याकडे स्वत:च निरखून पहायचे आणि त्या क्षणाला आठवणीत कैद करायचे.अशाच आठवणीना कैद करून आपण कैद केलेले क्षण सर्वान समोर सादर करण्याची संधी कोल्हापूर शहर वासियांना मिळणार आहे. आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोल्हापूर शहरातील गणेशोत्सवामध्ये एक नाविन्य आहे. आपल्या बाप्पाचे स्वागत कोल्हापूरकर मोठ्या थाटात करतात. बाप्पाची आरासही विविधतेने नटलेली असते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी संपूर्ण शहरवासीयांनी केली असून, आपल्या बाप्पा सोबत सेल्फी काढण्याचा मोह अबालवृद्धानाही आवरता येणार नाही. हिच संकल्पना प्रत्यक्षात उतरवून त्याला स्पर्धेचे स्वरूप आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवा सेनेच्या वतिने देण्यात आले आहे.
कोल्हापूर वासियांसाठी “सेल्फी विथ बाप्पा” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवा सेनेच्या वतिने करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरवात दि.०५ सप्टेंबर म्हणजेच बाप्पाच्या आगमनापासून होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य असून, आपल्या लाडक्या बाप्पा सोबतचा सेल्फी स्पर्धकांनी व्हाटसअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर या माहितीसह आयोजकांकडे जमा करायचा आहे. सदर सेल्फी फोटो आमदार राजेश क्षीरसागर आणि युवा सेनेच्या माध्यमातून फेसबुक वर प्रसिद्ध केला जाणार आहे. स्पर्धेच्या अखेरीस ज्याच्या फोटोला सर्वाधिक पसंती (लाइक) मिळतील असे प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवा सेनेच्या वतिने अनुक्रमे प्रथम, द्वीतीय, तृतीय असे रुपये पाच हजार, रुपये चार हजार, रुपये तीन हजार अशी भरघोस बक्षिसे देनेत येणार आहेत. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवा सेनेच्या वतिने करणेत आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता तसेच स्पर्धेचे नियम व अटीच्या अधिक माहिती करिता शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर, सौरभ कुलकर्णी (९५०३९८३४७२), अभिजित क्षीरसागर (७३५०५५९०९९) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply