
कोल्हापुर:आशिया खंडातील दूध संकलन सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणारा कोल्हापुर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विरोधकांच्या 5 जाहिर प्रश्नाना उत्तर न देताच सत्ताधारी मंडळींनी आटोपती घेतली.
याचा जाहिर निषेध करत आमदार सतेज पाटील यांनी ताराबाई पार्क येथील गोकुळ च्या मुख्यलायसमोर रस्यावरच समांतर सभा घेतली.सभासद आणि गोकुळ च्या हितसाठी आम्ही सदैव तत्पर आहे असे सांगत सत्ताधारी प्रश्नांना उत्तर देण्यास असमर्थ ठरले कारण त्यांच्याकडे उत्तर नाहीत गोकुळ च्या बचावासाठी हा लढ़ा असाच सुरु राहिल असे आ.बंटी पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शांत रहन्याचे आवाहन केले.पण सभेत गोंधळ झाला.संचालक अरुण नरके यांनी अमूल दूध महाराष्ट्रात हात पाय पसरण्याच्या तयारीत आहे.हे मोठे संकट अपल्यासमोर आहे.अमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले. यानंतर आम. पाटील यांनी 24 कोटी वहानां वरील खर्च कसा असा सवाल करत संचालक मंडळानी स्कारपीओ गाड्या वापरणे बंद करा अस सांगितले. अहवालात दिलीले अनेक खर्च अनाठायी आहेत. याची उत्तरे दया असे संगुनही सत्ताधारी संचालकांनी सभा अटोपली.
गोकुळ हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सभासदांचे हित कुठेच दिसत नाही. आगामी निवडणुकांचे केंद्रबिंदु बनले आहे असे आ. पाटील यांनी समांतर सभेत सांगितले.
Leave a Reply