
कोल्हापुर: आई वडील भाऊ बहीण या नात्यांपेक्षा आपण सर्वाधिक वेळ मित्रांसोबताच घालवत असतो.म्हणूनच आपल्या दोस्ताचे आयुष्यात खुप महत्व आहे.योग्य वयात मिळालेल्या चांगल्या मैत्रीमुळे आपले आयुष्य कसे बदलते यावर प्रजाषझोत टाकणारा मराठी चित्रपट ‘यारी दोस्ती ‘ येत्या 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
दोन अभ्यासु आणि त्यांना भेटलेली दोन सडकछाप अशिक्षित मुले या चौघांच्या भेटिमुळे काय घडते आणि त्यातून समाजाला जो सन्देश मिळतो त्यामुळे हा चित्रपट वेगळ्या ढंगाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे असे लेखक आणि दिग्दर्शक शांतनु अनंत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चित्रपटाची निर्मिति सरिता तांबे यांची असून अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि प्रवीण धोने यांनी गायलेली गाणी तरुणाईला भुरळ पाडत आहेत.पॅशनवल्ड एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या यारी दोस्ती या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी यातील हंसराज जगताप याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.तसेच संदीप गायकवाड, नम्रता जाधव, श्रेयष राजे,आकाश वाघमोडे, आशिष गाड़े, सुमित भोकसे यांच्याही ठळक भूमिका आहेत. मुले आणि पालक यांना पुन्हा पहावा वाटेल आणि विचार करायला लावणारा हा चित्रपट प्रेक्षकां च्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला.
Leave a Reply