
कोल्हापुर:नवरात्रीनिमित्त प. पु. श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून करण्यात आले आहे.यामध्ये 7 तारखेला महागणपती होम,नवग्रह शांती होम,वास्तु शांती होम,देवी सुक्त पठण तसेच 8 तारखेला महारुद्र होम,सुदर्शन होम आणि 9 तारखेला महा चंडी होम होणार आहे. देवीच्या नऊ रूपांचे पुजनही येथे होणार आहे.यासाठी आश्रमातील वेद विज्ञान महाविद्यापीठातून वेदाचार्य आले आहेत.अशी माहिती बेंगलोरचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्वामी संतोषजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच विविध नृत्यविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडिया होणार आहेत.तरी हा संपूर्ण कार्यक्रम आणि होम सत्संग लोकांसाठी मोफत असणार आहेत असे डॉ. राजश्री पाटील म्हणाल्या.
जीवनातील आणि वातावरणातील तणाव प्रदुषण आणि नकारात्मकता दूर होऊन अडचणी नाहीश्या होतात. वास्तु दोष,शत्रुत्व कमी होतात.ज्ञान ग्रहण शक्ती वाढते.आणि सर्वांगिण प्रगती होते.हाच यमागचा उद्देश्य आहे.गेली अनेक वर्षे हे कार्य अविरतपणे सुरु आहे असेही स्वामी संतोषजी यांनी सांगितले.
तरी यास कोल्हापुरकारांनी मोठ्या संख्येने आयर्वीन मल्टीपर्पज हॉल, गवत मंडई,शाहूपुरी येथे उपस्थित रहावे असे आवाहन आर्ट ऑफ लिविंगच्या कोल्हापुर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला मंदीर चव्हाण, पद्मनाभ देशपांडे, निखिल अग्रवाल,विनय पतंगे उपस्थित होते.
Leave a Reply