कागल: कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील यूनिकॉम लैबोरेटरी लिमिटेड या कंपनीत एअर टाकीचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले तर एक जखमी झाला.या कंपनीत फार्मसिटिकल ड्रग बनविणयांचे काम सुरु होते.बॉयलरचे काम सुरु असताना 20 फुटवारिल एअर टाकिचे झाकण अचानक प्रेशर कुकर प्रमाणे 40 फुट ऊंच कामगरांसाहित उडाले. त्यामुळे छोटू प्रसाद बिंद वय28 रा. तलंदगे आणि गिरिप्रसाद बिंद वय 45 रा.कणेरीवाडी जागीच ठार झाले आणि मेहंदी अंसारी वय 42 रा.भोजे मळा जखमी झाला. त्याला उपचारासाठी एस्टर आधारमधे दाखल केले आहे. करवीरचे पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.सुरीक्षततेसाठी योग्य काळजी न घेतल्याने हा अपघात घडला.कंपनीने स्फोटाची तीव्रता समजू नये म्हणून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंना घटनास्थळी मज्जाव केला आणि अधिकाऱ्यांनी उद्धत वर्तनही केले.
Leave a Reply