
कोल्हापूर: मराठी चित्रपटास सुगीचे दिवस आले असतानाचा दर्जेदार चित्रपटांमध्ये निखळ मनोरंजन आणि विनोदाने ठासून भरलेला जलसा हा मराठी चित्रपट येत्या येत्या २१ आक्टोंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होत प्रदर्शित आहे.स्टुडीओ ९ एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेला जलसा संपूर्णपणे विनोदाने भरलेला आणि विनोदाला वाहिलेला चित्रपट आहे.संपूर्ण कुटुंबाला फक्त मनोरंजीत करून एकत्रितपणे पाहण्यासारखाच हा चित्रपट आहे असे चित्रपटाचे दिग्दर्शक आशितोष राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.याचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत गणेशपुरे मोठ्या पडद्यावर प्रथमच स्त्री वेशभूषेत दिसत आहेत.तसेच गिरीजा जोशी,निखील वैरागर,शीतल अहिरराव ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच सागर कारंडे,अभिजित चव्हाण,अरुण कदम यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड हसवतील यात शंका नाही.यातील बाई वाड्यावर या हे गाणे सध्या खूप गाजतंय.जे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तुंग व्यक्तिमत्वाला आदराजंली आहे.या गाण्याला यु ट्यूबवर ३० लाख हिट्स मिळाले आहेत.समीर साप्तीकर यांचे संगीत राजेश बडवे यांचे नृत्य दिग्दर्शन आणि नृत्य बिजली मानसी नाईक हिच्या अदाकारीने हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले.सर्व टेन्शन्स दूर करून फक्त मनोरंजन करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास निर्माते,लेखक आणि दिग्दर्शक आशितोष राज आणि जलसा चित्रपटाच्या संपूर्ण टिमने व्यक्त केला.
Leave a Reply