
कोल्हापूर: मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, अॅट्रीसिटी कायद्यात बदल झाला पाहिजे आणि कोपार्डी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाचे आयोजन केले गेले.पहाटेपासूनच संपूर्ण जिल्ह्यातून लोक शहरात येत होते.मोर्चाची सुरुवात ताराराणी चौक आणि गांधी मैदान येथून ठीक ११ वाजता झाली.ठीक १२ वाजता लाखोंच्या संख्येने लोक दसरा चौकात जमा झाले. त्यानंतर 5 रणरागिणीनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याआधी यांनी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आजवर अनेक मोर्चे निघाले पण हा मोर्चा त्याच्या वैशिष्ठ्यांमुळे वेगळा ठरला.मूक मोर्चा असल्याने सहभागी लोकांनी अजिबात गडबड गोंधळ केला नाही.घोषणा दिल्या नाहीत की टाळ्या शिट्या वाजविल्या नाहीत.मोर्चा का निघाला आहे याचे भान सहभागी प्रत्येक महिला आणि लोकांनी ठेवले.अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने मोर्चा पार पडला.स्वयंसेवक म्हणजेच मावळे यांनी अतिशय सुनियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक आले तरी गोंधळ झाला नाही.
भर दुपारच्या रखरखीत उन्हातही आपल्या हक्कासाठी लोक रस्त्यावर बसून होते.पण संयोजकांनी पाण्याच्या पिशव्या वाटप केल्याने लोकांना दिलासा मिळत होता.सरबत,पाणी आणि अन्नदान यात कोल्हापूरने आपली दातृत्वाची परंपरा कायम राखली.दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्यावतीने,महालक्ष्मी धर्मशाळा यांच्यावतीने लोकांसाठी अन्नदान करण्यात आले.
कोल्हापूरच्या 5 रणरागिणीनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.यात फक्त तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या सई पाटील हिने मराठा समजला आरक्षण मिळालेच पाहिजे,स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असा मोर्चा निघाला आहे.मराठा समाज एकत्र आला आहे.महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत झालीच कशी? असा खणखणीत सवाल केला.प्रज्ञा जाधव हिने मराठा जेव्हा एकत्र येतो तेव्हा इतिहास घडतो,ही एकची ताकद आहे.८५ दिवस का लागतात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी? असा सवाल सरकारला केला.फस्त ट्रक कोर्टात याचा न्यायनिवडा होऊन यांना फाशीच झाली पाहिजे,शिवरायांच्या वेळी ही घटना घडली असती तर अश्या नाराधामांचे शीर कलम करून वेशीवर टांगले असते अशी तीव्र शब्दात शिवानी जाधव,तेजस्विनी पांचाळ आणि स्नेहल दुर्गुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोर्चाची सांगता दसरा चौकात राष्ट्रगीत आणि भारत मातेच्या जयघोषाने झाली.
Leave a Reply