कोल्हापूर: आज कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमहा मोर्चा निघाला.लाखो लोक रस्त्यावर उतरले.स्वातंत्र्यानंतर असा मोर्चा निघाला.मराठ्यांच्या अनेक मागण्या अनेकवर्षे प्रलंबित आहेत.यामध्ये कोपार्डी बलात्कार प्रकरणी गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे,जलद न्यायालयात याचा निकाल लागला पाहिजे,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,अॅट्रीसिटी कायद्यात बदल झाला पाहिजे,शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे,कै.अण्णासाहेब पाटील तरतूद अंतर्गत ५ हजार कोटींची तरतूद करावी,अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक २०१७ पूर्वी उभारलेच पाहिजे,१९ फेब्रुवारी ह्या एकाच दिवशी शिवजयंती सर्वत्र साजरी व्हावी या आणि अश्या मागण्यांचे निवेदन आज कोल्हापूरच्या रणरागिणीनी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना दिले.
यावेळी कोपार्डी हत्याकंडचा निषेध करण्यात आला.हा आत्मक्लेश आहे.मराठा समाज मागणारा आहे ओरबडणारा नाही आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका सर्व मराठ्यांनी एकत्रित येऊन ही वाज्रमुठ बांधली आहे.आता नेहमीच मराठा समाज आपल्या न्याय आणि हक्कासाठी जागरूक राहील अशा भावना लोकांच्यातून व्यक्त होत होत्या.

Leave a Reply