कोल्हापूर जिल्हयात 9 नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर

 

10_10_2016_photo_02कोल्हापूर: राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. 

यात मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती; तर नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल. असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हयात 9 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून यामध्ये 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा, 5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. यांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हयात आचार संहिता लागू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!