ईबीसी सवलत मर्यादा 6 लाख करणे हा मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

 

कोल्हापुर:भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने कोल्हापूर शहरात विविध आठ ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक निर्णयानिमीत्य अभिनंदनासाठी अत्यंत उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक क्रांतीची बीजे रोवणारा ऐतिहासीक निर्णय घेतला. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी आखुन दिलेल्या मार्गावर वाटचाल सुरु ठेऊन ईबीसी सवलत उत्पन्न मर्यादा २.५० लाखावरुन ६ लाख रुपये करुन शिक्षण क्षेत्रात सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरात विवेकानंद कॉलेज येथे भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा.रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आमदार अमल महाडीक, गोकुळ संचालक बाबा देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत परीसरातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती असणारी पत्रके वाटण्यात आली. हा आनंदाचा क्षण गोड करण्यासाठी सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा.रविजी अनासपुरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो क्रांतीकारी निर्णय घेतला आहे यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणापासून वंचीत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. देश सामर्थशाली बनवण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कटीबद्ध रहावे असे सांगीतले.

जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले की, ईबीसी सवलत योजना अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नामध्ये स्वत: लक्ष घालुन शिक्षण क्षेत्रात क्रांतीकरक ठरेल असा निर्णय घेतला आणि ईबीसी सवलत योजना २.५ लाखावरुन ६ लाख केली. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेंचा पुरेपुर लाभ घेऊन देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावे असे नमुद केले.
माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले की, ईबीसी सवलत योजना आठरा पगड जातीच्या सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना खुल्या केल्यामुळे शिक्षणापासून वंचीत असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने न्याय देण्याची भुमीका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रात अत्यंत दिमाखात स्वागत होत आहे. यावेळी माजी नगरसेवक आर.डी.पाटील, अ‍ॅड.संपतराव पवार, दिलीप मेत्राणी, मामा कोळवणकर, शिवाजी बुवा, दिग्विजय कालेकर, विजय सुतार, अमित माळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने न्यु कॉलेज परिसरामध्ये जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये यांच्या नेतृत्वाखाली सदर योजनेबद्द्ल माहिती पत्रके व पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगचे अध्यक्ष डी.बी.पाटील सर यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी नगरसेविका सौ मनिषा कुंभार, संजय सावंत, सुरेश जरग, भाऊ कुंभार, निलेश आजगांवकर, अक्षय मोरे, पारस पलिचा, गणेश लाड, सिद्धांत भेंडवडे, ओंकार जोशी, सौ भारती जोशी, सौ मधुमती पावनगडकर आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने गोखले कॉलेज येथे झालेल्या सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडीक म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, पं.दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना या सर्व योजनांचा प्रसार व प्रचार करुन भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी याची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवावी. त्याचबरोबर एकही विद्यार्थी या योजनांपासुन वंचीत राहु नये यासाठी प्रयत्नशील रहावे असे नमुद केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, गटनेते विजय सुर्यवंशी, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, सौ अश्विनी बारामते, सुनील कदम, सत्यजित उर्फ नाना कदम, मंडल अध्यक्ष संतोष माळी, गणेश देसाई, सर्जेराव जरग, गणेश चिले, आदित्य जमदाडे, नचिकेत भुर्के, संतोष भोसले, हर्षद कुंभोजकर, सयाजी आळवेकर, सुधीर देसाई, मयुरेश पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा लक्ष्मीपुरी मंडलाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष माती भागोजी, मंडल अध्यक्ष  विवेक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कॉमस कॉलेज येथे सदर येजनेची माहीती विद्यार्थ्यापर्यंत पोहचवली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घुंटे, जयदीप वेदपाठक, अभिजीत डुणुंग, विठ्ल देसाई, अशोक पेटकर, गिरीष मोरे, अतुल चव्हाण, अभिनंदन संगाज आदीं उपस्थित होते.
भाजपा शाहुपुरी मंडलाच्यावतीने शहाजी लॉ कॉलेज येथे या योजनांच्या माहितीसाठीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी श्रीराज होळकर, अमित टिक्के, कृष्णा चव्हाण, निशांत भांबवरेकर, प्रज्ञेश हमलाई, मयुर गवळी, वैभव आवळे, समाधान मोरे आदिंसह मंडल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा उत्तरेश्वर मंडलाच्यावतीने शहाजी कॉलेज येथे मंडल अध्यक्ष सतीश पाटील (घरपणकर) यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी निशांत बोळके, केदार घाडगे, राहुल घाडगे, शुभम पाटील, अरुण पाटील, अमोल संकपाळ, प्रशांत संकपाळ, युवराज संकपाळ, विरेंद्र मठपती, अनिरुद्ध बावडेकर, टोनी तोडकर, श्रीधर घाडगे, ओंकार संकपाळ, योगेश चौगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपा राजारमपुरी मंडलाच्यावतीने मंडल अध्यक्ष जयजसिं निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजाराम कॉलेज येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी, गद्रे मॅडम, सौ शिला कुरणे, धैर्यशील देसाई, महेश चव्हाण, भागवत, सौरभ पाटील, शेखर जाधव, तानाजी निकम, विनायक काटकर, विशाल कवाळे, संजय काटकर आदींसह मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा बावडा मंडलाच्यावतीने महावीर कॉलेज येथे मंडल अध्यक्ष डॉ. सदानंद राजवर्धन यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी धीरज उलपे, तानाजी रणदिवे, संजय जासुद, राजेंद्र पवार, स्वरुप चौगले, मनोज इंगळे, धीरज पाटील, सुरज चव्हाण आदी पदाधिकारी व वॉर्ड अध्यक्ष उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!