वळण’ चित्रपटाचा गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त

 

walan-muhurt-02मुंबई:आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास प्राप्त ठरणारा मराठी सिनेमा आता बॉक्सऑफिसवरही बाजी मारत आहे, त्यामुळे बॉलिवुडमधील दिग्गजांची पावलंही आता मराठीची वाट धरू लागली आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता मराठी सिनेमा आज एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे असं म्हटलं तरकाहीच वावगं होणार नाही. मनोरंजनासोबतच सामाजिक आशयही मांडणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट बनत आहेत.‘मुद्रा एंटरटेनमेंट प्रा. लि.’च्या ब्यानरखाली नावीन्याने नटलेल्या अशाच आणखी एका नवीन मराठी चित्रपटाच्या निर्मितीला सुरूवात केली जाणार आहे. ‘मुद्रा एंटरटेनमेंटप्रा. लि.’ अंतर्गत‘ वळण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा निर्माते सुमन पटेलआणि अनिल दुबे यांनी केली आहे. गोरेगाव येथील एम् स्क्वेअर स्टुडिओमध्ये गीत ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते सुमन पटेल आणि अनिल दुबे, दिग्दर्शक शिवा त्रिपाठी, संगीतकार नितीन हिवरकर, गीतकार प्रकाश राणे, कलाकार ऋतुराज फडके, सहदिग्दर्शक प्रशांत विलणकर, कार्यकारी निर्माता शेखर नागवेकर तसेच चित्रपटातील तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. यावेळीं गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजात‘‘बोले अंबे, बोल आता…’’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं. गीतकार प्रकाश राणेयांनी या गीताचे बोल लिहिले असून, संगीतकार नितीन हिवरकर यांनी संगीत दिलं आहे.

‘वळण’ या शीर्षकावरून चित्रपटामध्ये काय दडलं असणार याचा अंदाज बांधणं तसं कठीण आहे. कारण वळण हा बऱ्याच ठिकाणी फिट बसणारा शब्द आहे, त्यामुळे या चित्रपटात नेमकी कोणत्या वळणावरील कथा पाहायला मिळणार ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपटाची कथा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे. महाविद्यालयीन जीवन मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. या वळणावर घडणाऱ्या गोष्टी मुलांच आयुष्य जसं घडवू शकतात तसं बिघडवूही शकतात. या वळणावर त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलं तर त्यांचं आयुष्य घडतं, त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून एक विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मत निर्माते सुमन पटेल आणि अनिल दुबे यांनी व्यक्त केलं आहे. आजवर बऱ्याच चित्रपटां मधून केवळ महाविद्यालयीन जीवनातील प्रेम प्रकरण आणि यारी-दोस्तीच दाखविण्यात आलीआहे. पण‘ वळणचं कथानक या सर्वांपेक्षा वेगळ असल्याचं दिग्दर्शक शिवा त्रिपाठी यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईच्या जीवनातील आजवर कधीही प्रकाश झोतात न आलेले पैलू पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवा त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘वळण’ची कथा, पटकथा आणि संवाद संजीवरजत यांनी लिहिली आहेत. मोहन जोशी, वर्षा ऊसगांवकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णू, जैमिनी, राजकनोजिया आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. केमेरामन एस. कुमार भगत या चित्रपटाचं छायालेखन करणार असून प्रशांत विलणकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत. मयंक श्रीवास्तव याचित्रपटाचे कोरिओग्राफर असून महेंद्र राऊत कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. पूजा त्रिपाठी वेशभूषा करणार असून शेखर नागवेकर कार्यकारी निर्माते आहेत. मुहूर्तानंतर लगेचच‘ वळण’च्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!