कोल्हापूर : केएमटी बसला अपघात झाल्याने ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शिये जकात नाक्यावर घडली आहे. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला आहे. कसबा बावडा मार्गावरून वडगाव कोल्हापूर ही कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची बस जात होती. शिये नाक्यावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस सरळ रस्त्याकडेच्या ऊसाच्या शेतात गेली. या अपघातात बसमधील ९ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींमध्ये चालकाचा समावेश असून सर्वांना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली असून पोलिसही हजर झाले आहेत.
Leave a Reply