परांजपे स्कीम्सतर्फे कोल्हापूरमध्ये ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ गृहप्रदर्शनाचे आयोजन

 

img-20161019-wa0005कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रॅड म्हणून नावारूपास आलेल्या पुण्यातील ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’  या कंपनीने गेल्या २८ वर्षांच्या कालावधीमध्ये पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही १७०हून अधिक प्रकल्प नावारूपास आणले आहेत. खास कोल्हापूरमधील लोकांसाठी  ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन)  लि.’  कंपनीतर्फे  ‘ऑप्शन्सअनलिमिटेड’ या गृहप्रदर्शनाचे  आयोजन करण्यात येणार आहे. हे गृहप्रदर्शन.२२ ते२३ ऑकटोबर रोजी  हॉटेल पॅव्हेलियन मधील मधुसूदन हॉल येथेआयोजित करण्यात येणार असून   हे  गृहप्रदर्शन दोन्ही दिवशी सकाळी१० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणारआहे.अशी माहिती परांजपे स्किम्सचे प्रमुख अमित परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’ या कंपनीने आजवर जोडलेले ग्राहक आणि हितचिंतकांनी दिलेले पाठबळ आणि कंपनीवर दाखविलेल्या विश्वासाची पोचपावती म्हणून ‘ऑप्शन्सअनलिमिटेड’ हे  गृहप्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये ग्राहकांना रु.अगदी १२लाखांपासून घरांचे पर्याय उपलब्ध असून  मोठ्या शहरांतील आधुनिक जीवनशैलीने परिपूर्ण असे अनेक प्रकल्पयागृह प्रदर्शनामध्ये सादर केले जाणारआहेत.  अनेकांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या व बजेटमध्येही बसणाऱ्या घरांचे व व्यावसायिक जागांचे पर्याय इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत ही विशेष लक्षात घेण्यासारखी बाबआहे. या भव्यगृहमहोत्सवामध्ये पुणे, मुंबई, बेंगळुरु, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, वडोदराआणि  चिपळूण अशा ८ शहरांतील एकूण ४८ गृहप्रकल्पांतून आपल्या बजेटनुसार आपल्या आवडीचे घर अथवा व्यावसायिक जागा निवडण्याची संधी खरेदीदारांना मिळणार आहे.
तसेच जे ग्राहक ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहप्रदर्शनामध्ये घर ‘बुक’ करतील त्यांना घराच्या किंमतीवर भरघोस सवलती दिल्या जाणार आहे.तसेच अनेक नामांकित बँकांकडून त्वरीत गृहकर्जमंजुरीची सोय असणार आहे.’ऑप्शन्स अनलिमिटेड’  गृहप्रदर्शनातील सर्वयोजनांसाठी काही नियम व अटी लागू असतील तसेच काही निवडक गृहप्रकल्पांचा या योजनेमध्ये समावेश नसेल.
परांजपे कुटुंबात बांधकामक्षेत्राबाबतची परंपरा आठदशकांपूर्वी दृष्टे उदयोजक व्ही.बी.परांजपे यांनी१९३०मध्ये मुंबईमध्येसुरुकेली.सध्या ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’  या नावाने परिचितअसलेली कंपनी तिसऱ्या पिढीतील श्रीकांत व शशांक परांजपे यांनी स्थापन केली. ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’ने आजवर १७०हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. या कंपनीने एकूण १५ दशलक्षचौरसफुटांचे निवासी व व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केलेअसून, सध्या ११ दशलक्षचौरसफूटांहून अधिकप्रकल्पकंपनीकडेआहेत. तसेच ही कंपनी ज्येष्ठनागरिकांसाठी खासगृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात देखील अग्रगण्य
आहे. कोल्हापुरातही लोकांना परवडतील अशी घरे लवकरच उपलब्ध होणार आहे असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस कोल्हापुरचे व्यवस्थापक अनंत पराडकर, परांजपे स्कीम्सचे कर्मचारी ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!