
कोल्हापूर : आतंकवाद मिटवायचा असेल तर अँटी टेरीरिस्ट मिलिटरीची स्वतंत्र अस्तित्वात आणली जावी तसेच आतंकवादी केस मध्ये ६ महिन्यात पूर्ण निकाली काढली जावी अशी व्यवस्था सरकारने गांभीर्याने करायला हवी असे प्रतिपादन ऑल इंडिया अँटी टेरीरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम एम बिट्टा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
आतंकवादी पकडल्या नंतर त्यावर त्वरित निर्णय न होत्या त्या मुद्द्यावरून राजकारण केले जाते. यामुळे आतंकवादाला खतपाणी मिळत आहे. यावर उपाय म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी करावी. सर्जिकल स्ट्राईक वरून देखील देशात राजकारण होते ही दुर्दैवाची गोष आहे. पाकिस्तानला अनेक वेळा सांगून देखील आतंकवादी हल्ले केले जात आहेत त्याला उत्तर द्यायला भारत देश समर्थ आहे. परंतु हा देश गांधीच्या विचाराला देखील मानत असल्याने पाकिस्थानी सामान्य नागरिकांना कोणतहीही इजा होता कामा नये याचा देखील विचार भारत करते त्यामुळे युद्ध करण्याची भाषा वापरली जात नाही. परंतु वेळ पडल्यास चोख प्रत्युतर देण्याची तयारी भारताची आहे.
सैनिकांच्या कुटुंबाना सरकार कडून मिळणारी आर्थिक मदत खूप कमी आहे. जो देशासाठी शहीद झाला आहे त्यांचा कुटुंबाना किमान १ करोड रुपये मिळायला हवेत. मिलेट्रीमध्ये महाराष्ट्रीय लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे येथील सरकारने या गोष्टींचा अधिक विचार करावा.
भारतातील पैसा भारतात राहावा यासाठी चीनी वस्तू न वापरता लोकांनी स्वदेशी वस्तू वापराव्यात. मोदी सरकारने चांगल्या कामाला सुरुवात केली आहे. लोकांनी त्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. कॉंग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे चांगले नेते आहेत मात्र दिग्विजय सिंह आणि चिदंबरम सारख्या व्यक्तींच्यामुळे कॉंग्रेस डबघाईला आले असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply