
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार सतीश लळीत यांनी आज स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सांगली संप्रदा बीडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
आजच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत महत्त्वाचे व लोकप्रिय संपर्क माध्यम आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम, लोकाभिमुख निर्णय यांची माहिती तात्काळ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मनोदय सतीश लळीत यांनी यावेळी व्यक्त केला.
लळीत हे यापूर्वी नाशिक विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदीे कार्यरत होते. त्यांनी मुख्यमंत्री यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक, तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणूनही कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर शासनाच्या लोकराज्य मासिकाचे संपादक म्हणूनही योगदान दिले आहे. कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) श्रीमती वर्षा शेडगे या 31 जुलै 2016 रोजी निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते.
Leave a Reply