कोल्हापूर : कोल्हापुरात महिला वर्गाचे सौंदर्य जतन करण्याऱ्या आणि वाढवणाऱ्या ब्लशमी पिच हा अंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडीओ आता नवीन रुपात नवीन सुविधा आणि अंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनाचा वापर करून सर्व ब्युटी ट्रीटमेंटस करण्यासाठी कोल्हापुरात सज्ज झाला आहे.
युरोपमधील स्पेन येथे ब्युटी ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण करून गेली अनेक वर्षे विविध फॅशनशोज् मध्ये मुख्य मेकअप आर्टीस्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या कांचन चांदवाणी यांनी कोल्हापुरातील महिलांच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी ब्लशमी पिच हा ब्युटी स्टुडीओ कृपलानी हॉस्पिटल जवळ ताराबाई पार्क येथे नव्या रुपात सुरु केलेला आहे.
पुणे फॅशन विकमध्ये कांचन चंदवाणी यांना सेलीब्रेटीज आणि मॉडेल्स यांचा मेकप आणि हेअरस्टाईलिस्ट म्हणून काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. याच अनुभवाचा फायदा कोल्हापुरातील स्त्रियांना त्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे.
या ब्युटी स्टुडीओमध्ये व्हॅक्सिन, फेशियल, ब्लीच, स्पा, नेलआर्ट, हेअर कट्स, हेअरस्टाईल आणि मसाज यासारख्या सर्व ब्युटी ट्रीटमेंटस केल्या जाणार आहेत. यासाठी कांचन चंदवाणी यांच्या बरोबर त्यांनी प्रशिक्षित केलेले मेकअप आर्टीस्ट असणार आहेत. तसेच वापरण्यात येणारे प्रॉडक्ट हे अंतराष्ट्रीय दर्जाचे असणार आहेत. त्याचबरोबर महिलांच्या गरजेनुसार त्यांना भारतीय उत्पादनाचा वापर करूनही सर्व ब्युटी ट्रीटमेंटस मिळणार आहेत.
दिवाळीनिमित्त सर्व ब्युटी ट्रीटमेंटस आणि हेअर स्टाईलवर ५० टक्के भरघोस सूट मिळणार आहे. गुणवत्ता, योग्य सेवा यामुळे कोल्हापुरातील महिला वर्गासाठी ब्लशमी पिच हा ब्युटी स्टुडीओ म्हणजे स्वत:च्या सौदर्यात भर टाकण्यासाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. म्हणून हा ब्युटी स्टुडीओ स्त्रियांच्या पसंतीचे ठिकाण बनेल असा विश्वास संचालिका कांचन चंदवाणी, दिपाली भोसले आणि सर्व चंदवाणी परिवाराने यावेळी व्यक्त केला.
Leave a Reply