स्वामी तिन्ही ….भिकारी’ चित्रपटाच्या गाण्यात तब्बल एक हजार कलावंतांचा सहभाग

 

1v5a1271‘मुंबई:बाजीराव मस्तानीतलं मल्हारी असो किंवा अग्निपथमधील चिकनी चमेली अशा अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. गणेश आचार्य आणि भव्यता हे समीकरणच आहे. आता हिंदी चित्रपटांत असलेली भव्यता घेऊन गणेश आचार्य मराठी चित्रपटसृष्टीत आले आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेल्या स्वामी तिन्ही जगाचा… भिकारीया पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सुरू झालं. तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या गणपती बाप्पांवरील गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. आतापर्यंत मराठी चित्रपटांत चित्रीत झालेल्या गाण्यांमध्ये हे सुपरसाँगठरणार आहे.

मी मराठा एंटरटेन्मेंटच्या शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला स्वामी तिन्ही जगाचा… भिकारीहा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा मुहुर्त झाला होता. मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच सुरू झालं. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर देवा हो देवाहे गाणं चित्रीत करण्यात आलं. सुखविंदरसिंग यांनी गायलेलं हे गाणं मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. राहुल ठोंबरे आणि संजीव होवाळदार यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक गणेश आचार्यही नेहमीच्या शैलीत गाण्यात दिसणार आहेत. तीन दिवस या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं.

गजाननाया गाण्याच्या चित्रीकरणाचा तामझाम कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल इतका भव्य होता. खास या गाण्यासाठी चाळीस फूट उंचीचा सेट उभारण्यात आला. गणपती बाप्पांची ३५ फुटी मुर्ती ठेवण्यात आली होती. तब्बल एक हजार कलाकारांचा या गाण्यात सहभाग होता. सेटवर ढोलताशा, झांजांचा गजर होत होता. तसंच सतारही वाजवली जात होती. या चित्रीकरणावेळी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते. तब्बल २५० मोठ्या घंटा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात हे गाणं नक्कीच गाजणार आहे. या चित्रपटाची निर्मितीमूल्य पाहता, ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारीहा २०१७मधील बिगबजेट आणि बहुचर्चित चित्रपट ठरणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!