कोल्हापूर: सुधारित राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्षय रोग केंद्रात सध्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदाची ११ महिन्याच्या कालावधीसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.यात शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन करून ६२ एवजी ४२ वयोमर्यादा नमूद करून अनेक पत्र उमेदवारांवर अन्याय केला आहे.तसेच यापूर्वी भारती प्रक्रिया पूर्ण झालेल्या पी.पी.एम समन्वयक पदासाठीही असाच वयाच्या अटीचा हा नियम धाब्यावर बसविला आहे.या पदावर निवड झाल्यानंतर एम.एस.सी.आय.टी आणि ड्रायविंग लायसन देणे बंधनकारक असताना अनेक उमेदवारांना मुलाखतीस बोलावलेच नाही.यामुळे अनेक पात्र उमेदवारांची संधी हुकली.त्यांच्यावर अन्याय झाला आहे.आणि त्यांना अपात्र ठरविले गेले.या दोन्ही पदांसाठी सांगली व सातारा जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत ६२ वयोमर्यादा असताना फक्त कोल्हापुरातच ४२ वर्ष करून अनेकांवर अन्याय केला आहे.शासनच्या नियमांचे सरळ सरळ उल्लंघन केले आहे.अशी बेकायदेशीर भारती प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा सोशल मिडिया मेल यांनी केली आहे.तसेच पुन्हा नव्याने ही प्रक्रिया राबवावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.तसेच एस.टी.ओ.पुणे,महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्र्कांदादा पाटील मंत्रालय येथील आरोग्य सचिव तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदार यांनाही देण्यात येणार आहे.
Leave a Reply