
कोल्हापूर : आपण जसे आपले घर स्वच्छ व निटनेटके ठेवतो तसेच आपले कार्यालय व परिसर स्वच्छ व निटनेटके ठेवायला हवा अशी इच्छा निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केली. मध्यवर्ती प्रशासकीय इमातीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसचे होळकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होळकर व श्रीराज होळकर यांनीही यामोहिमेत सहभाग नोंदवून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविली.
इमारत परिसराच्या भोवती होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी त्यांनी नेमून दिलेल्या पार्किंगमध्येच वाहने पार्किंग करण्यासंदर्भांत यावेळी नागरिकांना आवाहन केले. त्याबाबतचे पार्किंग फलक लावण्यासंदर्भात व बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
स्वच्छता मोहिमेमध्ये राधानगरीच्या उपविभागीय अधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार रुपाली सरनोबत, उत्तम दिघे, नायब तहसिलदार संजय वळवी, अन्न धान्य वितरण अधिकारी नामदेव रेवडेकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
Leave a Reply