आ.राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी मेंदू विकाराने ग्रस्त रुग्णांना अडीच लाखांची मदत

 

medical-help-shahabuddin-balbale-05-01-2017कोल्हापूर : कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापूर शहरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याकरिता हजारो रुग्ण दाखल होत असतात. त्यातील बहुतांश रुग्ण हे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. या रुग्णांना उपचारा अभावी परतावे लागू नये, त्यांना दिलासा मिळावा या सामाजिक भावनेतून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्यावतीने गेल्या सहा ते सात वर्षामध्ये साडेसात हजार रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करणेत आल्या आहेत. त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर करून रुग्णांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.

       कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरात राहणारे सुधाकर शंकर बोरगे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. एके दिवशी डोके दुखू लागल्याने त्यांनी जवळच्या डॉक्टरांच्याकडे तपासणी केली. या डॉक्टरांनी त्यांना उपचाराकरिता अॅपल हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी श्री. सुधाकर बोरगे याना रुग्णालयात दाखल केले. त्यामध्ये श्री. सुधाकर बोरगे हे मेंदू विकाराने ग्रस्त असल्याचे निदान झाले. यावरील उपचाराकरिता रुपये २ लाख ५० हजार खर्च येणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर औषधोपचारासाठी रोजचा दोन– तीन हजार खर्च त्यात घरातील कर्ता पुरुष दवाखान्यात त्यामुळे धड काम नाही त्यात दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा या द्विधा मनस्थितीत असलेल्या बोरगे कुटुंबीय होते. त्याचवेळी काही नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. मग बोरगे कुटुंबीयांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्याना परिस्थिती सांगितली. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रे तयार करून घेऊन आर्थिक निधी मदतीचा अर्ज मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सादर केला. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून सौ.बेडेकर याना मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुपये एक लाखांची मदत करण्यात आली.

       त्याचबरोबर राजापूर येथील शहाबुद्दीन रफिक बलबले हे मेंदू विकाराने ग्रस्त असल्याने त्याना कोल्हापुरातील प्राईम हॉस्पिटल, बेलबाग येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरानी बलबले यांच्या शस्त्रक्रियेसाठी रुपये ३ लाख खर्च येणार असल्याचे सांगितले. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने बलबले कुटुंबीय हतबल झाले होते. नंतर कुटुंबीयांनी कोल्हापुरातील नातेवाईक असलेल्या नगरसेवक अफजल पिरजादे यांच्याशी संपर्क केला आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली. यावर तातडीने नगरसेवक अफजल पिरजादे यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर बलबाले कुटुंबियांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक निधी मदतीचा अर्ज मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सादर केला. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून सौ.बेडेकर याना मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुपये दीड लाखांची मदत करण्यात आली.

       आज शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शहाबुद्दीन बलबले आणि बोरगे कुटुंबियाना याना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरसेवक अफजल पिरजादे, शिवसेना उपशहरप्रमुख अमित चव्हाण, युवसेना शहरप्रमुख अविनाश कामते, महेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!